सन स्ट्रोक पासून बचाव करण्यासाठी 'हे' 4 घरगुती ड्रिंक्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 12:23 PM2019-04-13T12:23:19+5:302019-04-13T12:24:02+5:30

वातावरणातील उकाडा वाढत असून आरोग्याच्या समस्यांसोबतच त्वचेच्याही समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रखर ऊन आणि उष्णतेमुळे सन स्ट्रोकचा धोका वाढतो.

Home remedies or drinks to cure heat stroke | सन स्ट्रोक पासून बचाव करण्यासाठी 'हे' 4 घरगुती ड्रिंक्स 

सन स्ट्रोक पासून बचाव करण्यासाठी 'हे' 4 घरगुती ड्रिंक्स 

googlenewsNext

(Image Credit : Medical News Today)

वातावरणातील उकाडा वाढत असून आरोग्याच्या समस्यांसोबतच त्वचेच्याही समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रखर ऊन आणि उष्णतेमुळे सन स्ट्रोकचा धोका वाढतो. जास्तवेळ उन्हामध्ये राहिल्याने शरीराला थकवा जाणवतो आणि अस्वस्थ वाटतं. सन स्ट्रोक होण्याचं मुख्य कारण म्हणजे, डिहायड्रेशन आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही सन स्ट्रोकपासून बचाव करू शकता. 

कांद्याचा रस 

जेव्हा गोष्ट सन स्ट्रोकपासून स्वतःचा बचाव करण्याची असते. त्यावेळी शरीराला थंडावा देण्यासाठी कांद्याचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो. आयुर्वेदामध्ये असं सांगण्यात येतं की, सन स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी सर्वात गुणकारी ठरतो. कांद्याचा रस कान, छाती आणि पायांवर व्यवस्थित लावा. तुम्ही दररोज एक चमचा कांद्याचा रस थोड्या मधासोबत एकत्र करून घेऊ शकता. 

मूगाच्या डाळीचं पाणी

​ट्रेडिशनल चायनीज औषधांनुसार, मूगाची डाळ सन स्ट्रोकसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. तुम्ही ही एक किंवा दोन कप पाण्यामध्ये उकळून घ्या आणि जेव्हा पाणी अर्ध राहिल त्यावेळी गॅस बंद करा. त्यानंतर पाणी पिऊन टाका. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दररोज मुगाच्या डाळीचं पाणी प्यायल्याने उष्माघातापासून बचाव होतो. 

चिंचेचा ज्यूस 

सन स्ट्रोकवर चिंचेचा ज्यूसही फायदेशीर असतो. तुम्हाला तुमच्यामध्ये सन स्ट्रोकची लक्षणं जाणवतं असतील तर चिंचेचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. चिंचेचा ज्यूस तयार करण्यासाठी चिंचेचे तुकडे एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या. त्यामध्ये थोडीशी साखर किंवा मध एकत्र करा. तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही थोडसा लिंबाचा रस एकत्र करू शकता. चिंचेचा ज्यूस पिण्यासाठी तयार आहे. चिंचेचा ज्यूस डिहायड्रेशनमुळे झालेली शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता पूर्ण करण्यासाठी मदत करतो. 

ताक आणि लस्सी 

ताक आणि लस्सी दररोज प्यायल्याने तुम्ही स्वतःला उन्हाळ्यातही हेल्दी ठेवू शकता. तुम्ही सकाळी किंवा दुपारी जेवणासोबतही घेऊ शकता. अनेकजण उन्हाळ्यात भूक न लागण्याची तक्रार करत असतात. ताक भूक वाढविण्यासाठी मदत करत असतात. तर लस्सी शरीराला थंडावा देण्यासाठी मदत करते. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहचवत असून कोणताही दावा करत नाही. आपली प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असेत त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.)

Web Title: Home remedies or drinks to cure heat stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.