न्युमोनिया मुळापासून नष्ट करण्यासाठी 'हा' चहा ठरतो फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 04:14 PM2018-12-18T16:14:30+5:302018-12-18T16:16:05+5:30
थंडीमध्ये तापमान कमी असल्यामुळे आणि वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी, खोकला, ताप, अॅलर्जी, श्वासनाशी निगडीत आजार होण्याचा धोका असतो. या वातावरणामुळे रोगप्रतिकार शक्तीही कमकुवत होते.
थंडीमध्ये तापमान कमी असल्यामुळे आणि वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी, खोकला, ताप, अॅलर्जी, श्वासनाशी निगडीत आजार होण्याचा धोका असतो. या वातावरणामुळे रोगप्रतिकार शक्तीही कमकुवत होते. मुख्यतः लहान मुलं आणि वृद्ध माणसांना या वातावरणामुळे फार त्रास होतो. शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. थंडीमध्ये होणाऱ्या आजारांमध्ये न्युमोनिया हा एक मुख्य आजार आहे. लहान मुलांसह वयोवृद्धांपर्यंत सर्वांना हा आजार होण्याचा धोका असतो.
न्युमोनिया म्हणजे काय?
न्युमोनिया म्हणजे दोन्ही फुफ्फुसांमध्ये होणारं इन्फेक्शन. जे इन्फेक्शन फुफ्फुसांच्या पेशींना सूज आल्यामुळे होतो. बॅक्टेरिया, फंगस किंवा इतर अन्य वायरल इन्फेक्शनमुळे अनेकदा गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात. न्युमोनियामुळे रक्त प्रवाहामध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये खंड पडतो. न्युमोनियाबाबत सर्वात मोठी समस्या म्हणजे, हा आजार झालेल्या व्यक्तीमध्ये ताप, छातीमधील संक्रमण आणि खोकला यांसारखी साधारण लक्षणं दिसून येतात. त्यामुळे न्युमोनियाचे निदान करणं थोडं अवघड असतं.
थंडीमध्ये न्युमोनिया वाढण्याचा अधिक धोका का?
थंडीमध्ये लोकं घरामध्ये राहणं पसंत करतात. ज्यामुळे न्युमोनिया होण्याची शक्यता अधिक असते. याचं कारण म्हणजे घराच्या आतामध्ये अस्तित्वात असणारे बॅक्टेरिया, फंगस आणि वायरस. तापमान कमी झाल्यामुळे ताप, वायरस आणि बॅक्टेरिया हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरतात. तसेच थंडीमध्ये रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होते. त्यामुळे श्वासामार्फेत अनेक बॅक्टेरिया शरीरावर परिणाम करतात.
थंडीमध्ये न्युमोनियापासून वाचण्याचे उपाय :
- जास्त प्रवास करू नका
- गर्दीच्या ठिकाणी प्रवास करू नका
- न्युमोनिया झालेल्या व्यक्तींपासून दूर रहा
- प्रवासादरम्यान नाक, आणि तोंड स्कार्फच्या सहाय्याने बांधा
थंडीमध्ये न्युमोनियापासून बचाव करण्यासाठी तुळशीचा चहा फायदेशीर :
थंडीमध्ये न्युमोनियापासून बचाव करण्यासाठी किंवा घरामधील एखाद्या व्यक्तीला न्युमोनिया झाला असेल तर तुळशीचा चहा परिणामकारक ठरतो. आयुर्वेदामध्ये तुळशीचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, एनर्जी, व्हिटॅमिन्स, इलेक्ट्रोलाइट्स, मिनरल्स आणि अनेक फायटो न्युट्रिएट्सही आढळून येतात. ही सर्व पोषक तत्व हृदय, लिव्हर, फुफ्फुसं यांचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी फायदेशीर ठरतात. थंडीमध्ये नियमितपणे तुळशीच्या पानांचा चहा प्यायल्याने सर्दी, खोकला, ताप, न्युमोनिया यांसारख्या आजारांपासून बचाव करणं शक्य होतं.