गरम दुधात मध टाकून प्यायल्याने होतात फायदेच फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 11:55 AM2019-10-15T11:55:17+5:302019-10-15T12:02:12+5:30
दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. डॉक्टर्सही अनेकदा आहारात दुधाचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. डॉक्टर्सही अनेकदा आहारात दूधाचा समावेश करण्याचा सल्ला देतात. हाडांच्या मजबुतीसाठी दरदिवशी मुलांसोबतच वडिलधाऱ्यांनीही दूधाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. तुम्ही दूध आणखी हेल्दी करण्यासाठी त्यामध्ये मध एकत्र करून त्याचं सेवन करू शकता. जेव्हा आपण दूधामध्ये मद एकत्र करून त्याचं सेवन करतो तेव्हा दोन्ही पदार्थांमधील पोषक तत्व एकत्र होऊन एक हेल्दी ड्रिंक तयार होतं. दूधामध्ये हळद घातलेलं दूध आपण अनेकदा पितो. आरोग्यासाठी ते अत्यंत फायदेशीर ठरतं. खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही खोकला, सर्दी, ताप असेल. त्याचप्रमाणे गरम दूधात मध एकत्र करून पिण्याचेही अनेक फायदे आहेत. दोन्ही एकत्र करून प्यायल्याने याची हीलिंग प्रॉपर्टी वाढतात. जाणून घेऊया दूध आणि मध एकत्र करून प्यायल्याने आरोग्याला होणाऱ्या फायद्यांबाबत...
मध आणि दूधामध्ये असणारी पोषक तत्व...
मधामध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टी-बॅक्टेरियल, अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टी-फंगल गुणधर्म असतात आणि दूधामध्ये कॅल्शिअम असतं. त्याचबरोबर दूधामध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि डी, प्रोटीन आणि लॅक्टिक अॅसिडदेखील मुबलक प्रमाणात असतं. जे शरीराला कॅल्शिअमची कमतरता भासू देत नाहीत. हाडं आणि दातांच्या मजबुतीसाठी हे फायदेशीर ठरतं.
गरम दूधामध्ये मध एकत्र करून पिण्याचे आरोग्यदायी फायदे...
- जर तुम्ही तणावात असाल तर तुमच्यासाठी मध घातलेलं दूध पिणं फायदेशीर ठरतं. गरम दूधामध्ये एक चमचा मध एकत्र करा. याचं सेवन केल्याने मेंदूच्या पेशींना आराम मिळतो. तसेच तणाव, चिंता, मानसिक समस्यांपासून काही दिवसांतच सुटका होते.
- शांत झोप येत नसेल किंवा रात्री सतत झोप मोडण्याच्या समस्येने ग्रस्त असाल तर झोपण्यापूर्वी एक तास अगोदर दूधामध्ये एक चमचा मध एकत्र करू प्या.
- गरम दूधात मध एकत्र करून प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. दूधामध्ये मध एकत्र करा आणि प्या. तुम्हाला बद्धकोष्टाचा त्रास असेल तर त्यासाठीही फायदेशीर ठरेल.
- दूध आणि मध एकत्र करून लहान मुलांना पिण्यासाठी दिल्याने त्यांचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. हाडं बळकट होण्यासोबतच शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी हे मदत करतात.
- शरीरिक आणि मानसिक क्षमता वाढविण्यासाठीही मध गरम दूधासोबत एकत्र करून पिऊ शकता.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणाताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)