'असा' निवडा हेल्दी आणि बॅलेन्स्ड डाएट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 06:57 PM2019-02-11T18:57:13+5:302019-02-11T18:59:13+5:30

आपल्या रोजच्या धावपळीमुळे अनेकदा शरीराकडे दुर्लक्षं होतं. तसेच शरीराला आवश्यक अशा पोषक तत्वांची कमतरता भासते. खरं तर आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपल्याला दररोज काही पोषक तत्वांची गरज भासते.

How to choose healthy and balanced food in daily diet | 'असा' निवडा हेल्दी आणि बॅलेन्स्ड डाएट!

'असा' निवडा हेल्दी आणि बॅलेन्स्ड डाएट!

Next

आपल्या रोजच्या धावपळीमुळे अनेकदा शरीराकडे दुर्लक्षं होतं. तसेच शरीराला आवश्यक अशा पोषक तत्वांची कमतरता भासते. खरं तर आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपल्याला दररोज काही पोषक तत्वांची गरज भासते. पण रोजच्या कामाच्या धावपळीमुळे सर्व पोषक तत्व आरोग्याला मिळतातच असं नाही. आपल्या डेली फिजिकल अ‍ॅक्टिविटीसाठी अनेक प्रकारचे न्यूट्रीएंट्स शरीरासाठी आवश्यक असतात. हे न्यूट्रीएंट्स आपल्या आहारातून शरीराला मिळतात. असा आहार जो आपल्या शरीराच्या सर्व गरजांना पूर्ण करू शकेल त्यालाच बॅलेन्स्ड डाएट असं म्हटलं जातं. बॅलेन्स्ड डाएटबाबत आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते, त्यामुळे अनेकदा पोटभर नाश्ता किंना जेवणं केल्यानंतरही शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला बॅलेन्स्ड डाएट आणि त्याच्या महत्त्वाबाबत सांगणार आहोत.

काय असतं बॅलेन्स्ड डाएट?

आपल्या शरीराचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी अनेक न्यूट्रियंट्सची आवश्यकता असते. हे न्यूट्रियंट्स कोणत्या एका पदार्थामुळे नाही तर वेगवेगळ्या पदार्थांमुळे मिळतात. जसं फळं, भाज्या, डाळी, धान्य, डेअरी प्रोडक्ट्स इत्यादी. या सर्व पदार्थांचं आपल्या डेली डाएटमध्ये वेगवेगळं महत्त्व असतं. त्यामुळे एक बॅलेन्स्ड डाएट सिलेक्ट करताना या सर्व पदार्थांचा समावेश असेल याची काळजी घेणं आवश्यक असतं. 

प्रोटीन

प्रोटीन आपल्या शरीराचा विकास होण्यासाठी मदत करतं. प्रोटीनची कमतरता झाल्यामुळे शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये प्रामुख्याने सांधेदुखी, हृदयाच्या समस्या, केस गळणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यासाठी आहारामध्ये प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ म्हणजेच, अंडी, सी-फूड, दही, डाळी, ड्रायफ्रूट्स यांचा समावेश करावा लागतो. 

शुगर आणि फॅट्स 

शुगर आणि फॅट्सचा आरोग्यावर फक्त नेगेटिव्ह परिणाम होत नाही. पण याचा गरजेपेक्षा जास्त सेवन करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. एका बॅलेन्स्ड डाएटमध्ये फॅट आणि शुगरचं असणंही आवश्यक आहे. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतं. तूप, तेल आणि लोणी यांसारख्या पदार्थांमधून शरीराला फॅट्स मिळतात. तर गुळ, मध यांसारख्या पदार्थांमधून शरीराला शुगर मिळण्यास मदत होते. 

व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स 

ताजी फळं आणि भाज्यांमधून व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतात. यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. 

कार्बोहाइड्रेट

शरीराला कार्बोहाइड्रेटमुळे एनर्जी मिळते. आपल्याला डाएटमध्ये कार्बोहाइड्रेटयुक्त पदार्थांचा समावेश करणं आवश्यक असतं. यामध्ये धान्य, ब्राउन राइस, डाळी, फळं यांचा समावेश करा. तसेच या पदार्थांमध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट्सही मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे कॅन्सरसारख्या रोगांपासून आपलं रक्षण करण्यासाठी मदत करतात. 

कॅल्शिअम

आपल्या शरीरामध्ये हाडं आणि दातांच्या विकासासाठी तसेच त्यांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी कॅल्शिअम असणं अत्यंत आवश्यक आहे. याव्यतिरिक्त कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे स्नायूंवरही परिणाम होतो. त्यामुळे आहारामध्ये दूध आणि इतर डेअरी प्रोडक्ट्सचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: How to choose healthy and balanced food in daily diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.