सकाळी रिकाम्यापोटी घ्या हा खास चहा, अॅसिडीटी आणि पोटाची समस्या पळवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 11:06 AM2018-09-19T11:06:51+5:302018-09-19T11:08:06+5:30
सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅसची समस्या होऊ शकते. ही समस्या पुढे अॅसिडीटीचं रुप घेते.
अनेकांना सकाळी उठून चहा पिण्याची सवय असते. काहींचा तर चहा किंवा कॉफी घेतल्याशिवाय दिवस उगवत नाही. सकाळी सकाळी मिळालेला गरम चहा टेस्टी तर असतो पण तो आपल्या आरोग्यासाठी चांगला नसतो. सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅसची समस्या होऊ शकते. ही समस्या पुढे अॅसिडीटीचं रुप घेते. एक्सपर्टनुसार, सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेऊ नये. याने पोटदुखीसोबत डोकेदुखीही सुरु होऊ शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक असा चहा सांगणार आहोत ज्याने तुमची तलबही जाईल आणि आरोग्यही चांगलं राहिल.
लिंबू आणि मधाचा चहा
तुम्ही अनेक लोकांना सकाळी लिंबूसोबत गरम पाणी किंवा मधासोबत गरम पाणी पिताना पाहिलं असेल. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र लिंबू आणि मधाचा खास चहा सुद्धा तुम्हाला अॅसि़डीटी होण्यापासून रोखू शकतो. तसेच याने तुम्हाला दिवसभर एनर्जीही मिळेल. हा चहा रिकाम्या पोटी प्यायल्यास फायदा अधिक होतो.
काय होतात फायदे?
1) वजन कमी करण्यास मदत
२) त्वचा मुलायम आणि ग्लोइंग होते
३) केसगळती थांबते
४) किडनी आणि रोगप्रतिकारकशक्ती सुधारते
चहासाठी साहित्य
एक लिंबू
२ चमचे मध
२ काळे मिरे आणि एक वेलची
२ कप पाणी
कसा बनवाल?
1) सर्वातआधी पाणी गरम करा
२) यात वेलची आणि काळे मिरे बारीक करुन टाका. एक मिनिटापर्यंत हे गरम होऊ द्या.
३) आता त्यात एका लिंबाचा रस आणि दोन चमचे मध टाका.
४) दोन मिनिटे हे चांगले शिजू द्या. तुमचा खास चहा तयार आहे.