कांदा कापताना डोळ्यांतून पाणी येतयं? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 03:12 PM2018-09-10T15:12:53+5:302018-09-10T15:14:13+5:30
भारतीय खाद्यपदार्थांमध्ये कांद्यांचा प्रामुख्याने वापर करण्यात येतो. भाजी असो किंवा मसाले, सर्व पदार्थांमध्ये कांद्याचा वापर करण्यात येतो.
भारतीय खाद्यपदार्थांमध्ये कांद्यांचा प्रामुख्याने वापर करण्यात येतो. भाजी असो किंवा मसाले, सर्व पदार्थांमध्ये कांद्याचा वापर करण्यात येतो. पण कांदा कापताना अनेकदा डोळ्यातून पाणी येतं. यामागील कारण म्हणजे कांद्यामध्ये असलेलं अमीनो अॅसिड याला सल्फोऑक्साइड असंही म्हटलं जातं. अनेक लोकं डोळ्यांना होणारी जळजळ आणि डोळ्यांतून येणाऱ्या पाण्यामुळे कांद्यापासून दूर जातात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून काय उपाय करता येऊ शकतात त्याबाबत...
1. कांदा फ्रिजमध्ये ठेवा
कांदा कापण्याआधी एक किंवा दोन तास आधी कांदा फ्रिजमध्ये ठेवा. कांदा थंड झाल्यानंतर त्यातून बाहेर पडणाऱ्या सल्फोऑक्साइड गॅसचे प्रमाण कमी होते. पण साल काढलेला किंवा कापलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवू नका. त्यामुळे कांद्याचा उग्र वास फ्रिजमध्ये पसरू शकतो.
2. मेणबत्ती पेटवा
तुम्ही जिथे कांदा कापणार असाल त्या जागेवर मेणबत्ती पेटवा. मेणबत्तीमधून बाहेर पडणारा धूर तुमच्या डोळ्यांजवळ वॉटर-एयर बाउंडरी तयार करेल. त्यामुळे तुमच्या डोळ्यांवर कांद्याचा परिणाम कमी होईल.
3. पाण्यामध्ये भिजवून घ्या.
कांदा कापण्याआधी साल काढून पाण्यामध्ये भिजत ठेवा. यामुळे कांद्यामधून बाहेर पडणारा सल्फोऑक्साइड गॅस निघून जातो त्यामुळे डोळ्यांमधून पाणी येत नाही. कांदा कापण्यापूर्वी अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजत ठेवा.
4. तोंडामध्ये ब्रेडचा तुकडा ठेवा.
कांदा कापताना तोंडामध्ये ब्रेडचा तुकडा ठेवा. हा तुकडा चावताना कांद्यातून बाहेर पडणाऱ्या गॅसमुळे डोळ्यांना कमी हानी पोहोचेल. कारण ब्रेड चावल्याने कांद्यामधून बाहेर पडणारा गॅस ब्रेडच्या तुकड्यात शोषला जाईल.
5. चश्मा घालून कांदे कापा
जेव्हा कांदा कापत असाल त्यावेळी तुम्ही सनग्लास किंवा स्विमिंग ग्लास वापरू शकता. त्यामुळे कांद्यातून बाहेर पडणाऱ्या गॅसपासून डोळ्यांचा बचाव होतो. परिणामी डोळ्यांमधून पाणी येत नाही.
6. चाकूवर लिंबू चोळा
कांद्यातून बाहेर पडणाऱ्या गॅसवर लिंबाचा वापर करणं परिणामकारक ठरतं. ज्या चाकूने तुम्ही कांदा कापत असाल त्या चाकूवर लिंबाचा रस लावा. त्यामुळे कांद्यातील गॅस डोळ्यांपर्यत पोहचू शकत नाही. त्यामुळे डोळ्यांमध्ये पाणी येत नाही.
7. च्युएंगम खा
कांदा कापताना च्युएंगम चावत राहिल्याने तुम्ही तोंडाने श्वास घेता. त्यामुळे कांद्यातून निघणारा गॅस नाकामार्फत डोळ्यांपर्यंत पोहोचणार नाही. परिणामी डोळ्यांमधून पाणी येणार नाही.