भेंडीची भाजी आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर, जाणून घ्या ७ फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 10:27 AM2019-03-13T10:27:11+5:302019-03-13T10:31:10+5:30

हिरव्या भाज्यांमध्ये भेंडीच्या भाजीला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. अनेकप्रकारचे पौष्टीक तत्व आणि प्रोटीन असल्याकारणाने भेंडी आरोग्यासाठी फार फायदेशीर राहते.

How lady finger or okra flower amazing 7 health and beauty benefits | भेंडीची भाजी आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर, जाणून घ्या ७ फायदे

भेंडीची भाजी आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर, जाणून घ्या ७ फायदे

googlenewsNext

हिरव्या भाज्यांमध्ये भेंडीच्या भाजीला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. अनेकप्रकारचे पौष्टीक तत्व आणि प्रोटीन असल्याकारणाने भेंडी आरोग्यासाठी फार फायदेशीर राहते. भेंडीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फास्फोरस, आयर्न, मॅग्नेशिअण, पोटॅशिअम, सोडियम आणि कॉपर आढळतात. यात भरपूर प्रमाणात फायबर आढळतं, ज्याने डायबिटीजच्या रुग्णांना फायदा होतो. चला जाणून घेऊ भेंडीच्या भाजीचे इतरही फायदे....

वजन कमी करण्यासाठी

भेंडीमध्ये कॅलरी कमी असतात, १०० ग्रॅम भेंडीमध्ये केवळ ३३ कॅलरी असतात. त्यामुळे ही भाजी वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. पण केवळ भेंडीची भाजी खाऊन वजन कमी होईल अजिबात नाही. पण याने वजन कमी होण्यास मदत नक्कीच होऊ शकते. 

हृदयरोगांपासून बचावासाठी

भेंडीमध्ये असलेल्या पेक्टिन विरघळणारं फायबर शरीरात कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. आणि याप्रकारे भेंडी हृदय रोग रोखण्यासाठी फायदेशीर ठरते. भेंडीमध्ये असलेल्या करसेटिन तत्व कोलेस्ट्रॉलचं ऑक्सिकरण रोखण्यास मदत करतं. ज्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होऊ शकतो. 

डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी

फायबर भरपूर प्रमाणात असलेली भेंडी पचन क्रियेसाठी आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच भेंडी अ‍ॅंटी डायबिटीक गुण एंजाइम मेटाबॉलिज्म कार्बोहायड्रेटला कमी करण्यासाठी आणि इंसुलिनचं उत्पादन वाढण्यासाठी मदत करते. 

इम्यूनिटी मजबूत करा

भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे आपली इम्यूनिटी मजबूत होते आणि वेगवेगळ्या रोगांशी आणि इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता वाढते. १०० ग्रॅम भेंडी आपली व्हिटॅमिन सी ची ३८ टक्के गरज भागवते. त्यामुळे भेंडीची भाजी खाणे फायदेशीर ठरते. 

गर्भवती महिलांसाठी चांगली

भेंडीमध्ये व्हिटॅमिन बी९ आणि फोलिस अ‍ॅसिड तत्व असतात. ज्यामुळे गर्भवती महिलेला त्यांच्या नवजात बाळामध्ये न्यूरोलॉजिकल बर्थ डिफेक्ट रोखण्यास मदत मिळते. 

मेंदूसाठी फायदेशीर

वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टीक तत्व आणि प्रोटीन असल्याकारणाने भेंडी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. भेंडीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फास्फोरस, आयर्न, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, सोडियम आणि कॉपर आढळतात. मधुमेह, ब्रेस्ट कॅन्सर अशा रोगांवरही भेंडी हे औषधांच्या बरोबरीने उपयोगी पडते. हे सर्व फायदे मिळवण्यासाठी भेंडी खायला हवी.

कॅन्सर रोखण्यासाठीही मदत होते

न्यूट्रीशन जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, यात असलेल्या हाय अ‍ॅंटी-ऑक्साइड आफल्या सेल फ्री रॅडिकल सेल्सने डॅमेज होण्यापासून बचाव करतात आणि शरीरात कॅन्सर सेल्स वाढण्यापासून रोखतात. 

(टिप - वरील गोष्टी केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याचा थेट समस्यांवर उपाय म्हणून वापर करू नका. काहीही समस्या असेल तर आधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्यानंतर उपचार घ्यावे. वरील गोष्टींनी आजार किंवा समस्या दूर होतीलच असा दावा आम्ही करत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना ही वेगळी असते.)

Web Title: How lady finger or okra flower amazing 7 health and beauty benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.