खमंग दह्यातलं वांग्याचं भरीत; खायला भारी याची बातच न्यारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 05:47 PM2019-10-02T17:47:54+5:302019-10-02T17:49:21+5:30
बाजारात वांग्याची आवाक वाढल्यामुळे घराघरात वांग्याच्या पदार्थांची मेजवाणीच असते. त्यामध्ये वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो.
बाजारात वांग्याची आवाक वाढल्यामुळे घराघरात वांग्याच्या पदार्थांची मेजवाणीच असते. त्यामध्ये वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. अशातच अनेकदा तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तुम्हीही वांग्याच्या हटके रेसिपीचा विचार करत असाल तर भरीत तुम्ही थोड्या वेगळ्या अंदाजात तयार करू शकता
अशीच एक हटके रेसिपी म्हणजे, दह्यातले वांग्याचे भरीत...
साहित्य :
- खमंग भाजलेले वांगं
- दही
- मीठ
- हिरवी मिरीच
- हिंग
- जिरं
- तूप
- ओलं खोबरं
- बारीक चिरलेला कांदा.
कृती :
- भाजलेले वांग सोलून कुस्करून एकजीव करावे.
- हिरवी मिरची बारीक ठेचून घ्यावी. ओलं खोबरं, कांदा, मीठ हे जिन्नस वांग्यात मिसळून कालवावे.
- एकदा परतावे. मग दही मिसळावे. वरून हिंग व जिऱ्याची तूपात फोडणी करावी. त्यावर ती फोडणी घालावी.
-मिश्रणाला पुवरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी.