Dal Khichdi Recipe : हॉटेलस्टाईल चविष्ट दाल खिचडी, एकदा करून बघाच....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 04:26 PM2019-12-11T16:26:35+5:302019-12-11T16:34:32+5:30

Dal Khichdi Recipe : रोज रोज घरचं जेवण खाऊन कंटाळा आला की हॉटेलला जायचं मन होत.

How to make dal khichdee at home | Dal Khichdi Recipe : हॉटेलस्टाईल चविष्ट दाल खिचडी, एकदा करून बघाच....

Dal Khichdi Recipe : हॉटेलस्टाईल चविष्ट दाल खिचडी, एकदा करून बघाच....

Next

रोज रोज घरचं जेवण खाऊन कंटाळा आला की हॉटेलला जायचं मन होतं.  हॉटेल्सच्या चवीचे पदार्थ तुम्ही घरच्याघरी सुध्दा तयार करू शकता. आज आम्ही अशी रेसिपी सांगणार आहोत, जी सगळ्यांनाच हॉटेल स्टाईलची आवडत असते. चला  तर मग जाणून घेऊया कशी तयार करायची घरच्याघरी दाल खिचडी. 


साहित्य:
१ कप तांदूळ
१/२ कप मूग डाळ (टीप १ व २)
तीन ते साडेतीन कप गरम पाणी (टीप ३)
फोडणीसाठी:- १ टेस्पून तेल,
 २ चिमटी मोहोरी, 
१/४ टिस्पून जिरे, 
चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद,
 १/४ टिस्पून लाल तिखट
१/२ कप मटार (टीप ५)
१ टिस्पून गोडा मसाला
चवीपुरते मिठ

कृती:

१) खिचडी करायच्या आधी तांदूळ आणि डाळ एकत्र करून पाण्याने स्वच्छ धुवावे. पाणी काढून १/२ तास निथळत ठेवावे.
२) लहान कूकरमध्ये तेल गरम करावे त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, आणि तिखट घालून फोडणी करावी. नंतर डाळ आणि तांदूळ घालून परतावे. साधारण ३-४ मिनीटे परतावे. डाळ-तांदूळ चांगले कोरडे झाले पाहिजेत.
३) डाळ तांदूळ परतले कि मटार टाकून थोडासा वेळ आणखी परतावे. नंतर यात गरम पाणी घालावे. गोडामसाला आणि मिठ घालावे. ढवळून पाण्याची चव पाहावी. लागल्यास मिठ, किंवा लाल तिखट घालावे.
४) पाण्याला उकळी आली कि कूकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या होवू द्याव्यात. वाफ मुरली (साधारण १० मिनीटे) की कूकर उघडून खिचडी सर्व्ह करावी., खिचडीवर १ चमचा तूप घालावे.

(सौजन्य- my4marathi)

Web Title: How to make dal khichdee at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.