झटपट, गावरान खान्देशी खिचडी नक्की ट्राय करा, एकदा खाल तर बोटं चाखत रहाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 12:03 PM2019-12-15T12:03:27+5:302019-12-16T13:39:06+5:30
जेवणात दररोज चपाती, भाजी आणि वरण, भातं खाऊन काहीवेळा कंटाळा आलेला असतो
(Image credit- picpanzee.com)
जेवणात दररोज चपाती, भाजी आणि वरण, भातं खाऊन काहीवेळा कंटाळा आलेला असतो. तर काहीतरी नविन मात्र झटपट होणारं काय बनवता येईल, असा प्रश्न प्रत्येक घरातील महिलांना पडलेला असतो. तुम्हाला सुध्दा सुट्टीच्या दिवशी काही नविन खावसं किंवा बनवावसं वाटत असेल तर आज आम्ही खास पदार्थ तुम्हाला सांगणार आहोत जो अगदी कमी वेळात तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कशी तयार करायची खान्देशची स्पेशल खिचडी.
(image credit- Madhura's recipe)
खान्देशी खिचडी बनवण्यासाठी साहित्य
3 वाटी तांदूळ
1 वाटी तूर डाळ
तेल
राई, जिरं
लसूण,2 कांदा
1 मोठा टॉमॅटो
1छोटा बटाटा
2 चमचा तिखट
अर्धा चमचा गरम मसाला
धने जिर पूड
हळद
कोथिंबीर
दोन ते अडीच तांब्या पाणी
(Image credit - flavourednama)
कृती
कुकर मध्ये तेल टाकून राई, जिर घाला.
लसूण कांदा घाला,
कांदा गुलाबी झाल्यावर टॉमॅटो घाला,
कांदा नरम झाल्यावर त्यात तिखट ,मसाला, धने जिरेपूड, हळद घालून पाणी घाला.
त्यानंतर बटाटा, वाटाणे, शेंगदाणे घाला.
तांदूळ आणि तूर डाळ धुऊन पाण्यात घाला.
मीठ ,कोथींबीर घाला
खिचडीतले पाणी अर्धे झाल्यावर कुकर लावून ३ शिट्टी घ्या
कुकर थंड झाल्यावर उघडा..
ही खिचडी तुम्ही पापड, लोणचं आणि कांद्यासोबत खाऊ शकता.
(सौजन्य- betterbutter)