घरच्या घरी असा तयार करा मॅगी मसाला; जेवण रूचकर करण्यास ठरेल फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 03:26 PM2018-10-04T15:26:10+5:302018-10-04T15:28:54+5:30
फक्त दोन मिनिटांत तयार होणारी मॅगी बघता बघता सर्वांच्या; जीवनाचा अविभाज्य घटक बनली. फार भूक लागली की, झटपट तयार होणारं काही खायचं असेल तर सर्वांसमोर एकच पर्याय असतो तो म्हणजे मॅगी.
फक्त दोन मिनिटांत तयार होणारी मॅगी बघता बघता सर्वांच्या; जीवनाचा अविभाज्य घटक बनली. फार भूक लागली की, झटपट तयार होणारं काही खायचं असेल तर सर्वांसमोर एकच पर्याय असतो तो म्हणजे मॅगी. अनेक जण तर मॅगी खाण्यासाठी कारणचं शोधत असतात. मॅगीपासून अनेक रेसिपीही तयार करण्यात येतात. पण ज्या मॅगीची चव सर्वांच्याच जीभेवर रेंगाळत असते त्याच्या चवीमध्ये सर्वात मोठा वाटा हा मॅगीच्या पाकीटात असणाऱ्या मसाल्याचा असतो. या मसाल्याची चव फार वेगळी आणि सर्वांना हवीहवीशी वाटणारी असते. हीच गोष्ट ओळखून कंपनीने आता मॅगी मसाल्याचे वेगळे पॅकेट्स विकण्यास सुरुवात केली आहे. हा मसाला एखाद्या भाजीमध्ये टाकून तुम्ही त्याची चव वाढवू शकता. पण तुम्हाला माहिती आहे का? हा मसाला तुम्ही घरच्या घरीही तयार करू शकता.
मॅगी मसाला घरच्या घरी तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य -
कांद्याची पावडर - 3 मोठे चमचे
लसणाची पावडर - 3 मोठे चमचे
कॉर्न फ्लोअर - 2 1/2 चमचा
पीठी साखर - 10 मोठे चमचे
आमचू पावडर - 2 मोठे चमचे
सूंठ पावडर - दीड चमचा
View this post on Instagram
चिली फ्लेक्स - 3 मोठे चमचे
हळद - 1 मोठा चमचा
जिरं - 2 मोठे चमचे
काळी मिरी - 3 मोठे चमचे
मेथीचे दाणे - 1 मोठा चमचा
लाल मिरची - 3 ते 4
धने - 2 मोठे चमचे
तेजपत्ता - 2
चवीनुसार मीठ
मॅगी मसाला तयार करण्याची कृती -
- मॅगी मसाला तयार करण्यासाठी सर्वात आधी, जिरं, तेजपत्ता, मेथी, मिरची, धने आणि काळी मिरची 2 ते 3 तासांसाठी उन्हामध्ये ठेवा. त्यामुळे त्यातील पाण्याचे प्रमाण सुकून जाईल.
- जेव्हा सर्व मसाले सुकून जातील त्यावेळी एका पॅनमध्ये मंद आचेवर भाजून घ्या.
- चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवा.
- थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारिक करून घ्या.
- जेव्हा मसाले बारिक होतील तेव्हा त्यामध्ये लसणाची पावडर, कॉर्न फ्लोर, आमचूर, साखर, सुंठ, हळद, चिली फ्लेक्स आणि मीठ टाकून बारिक करून घ्या.
- आता सर्व मिश्रण एका चाळणीमध्ये टाकून चाळून घ्या.
- तुमचा स्वादिष्ट असा मॅगी मसाला तयार आहे.