संध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 04:37 PM2018-10-19T16:37:34+5:302018-10-19T16:37:48+5:30
संध्याकाळच्यावेळी अनेकदा भूक लागते. अशावेळी चहासोबत काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होते. दिवसभराचं काम आणि थकवा नाहीसा करण्यासाठी चहासोबत मस्त असं काही खायला मिळालं तर बात औरचं असते.
संध्याकाळच्यावेळी अनेकदा भूक लागते. अशावेळी चहासोबत काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होते. दिवसभराचं काम आणि थकवा नाहीसा करण्यासाठी चहासोबत मस्त असं काही खायला मिळालं तर बात औरचं असते. तसेच अनेकदा मुलं शाळेतून आल्यावर त्यांना खाण्यासाठी काय द्यावं? हा प्रश्न उभा राहतो. अशावेळी तुम्ही खमंग, खुसखुशीत, चटपटीत असा मसाला पापड नक्की ट्राय करू शकता. यामुळे तुमची भूकही भागेल आणि तुमची चटपटीत खाण्याची इच्छाही पूर्ण होईल. जाणून घेऊयात मसाला पापड तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- उडदाच्या डाळीचे पापड
- बारिक चिरलेला कांदा
- बारिक चिरलेला टॉमेटो
- बारिक शेव
- कोथिंबीर
- हिरवी मिरची
- चाट मसाला
- काळं मीठ
- लिंबाचा रस
- तेल
कृती :
- एका बाउलमध्ये बारिक चिरलेला कांदा, टॉमेटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, चाट मसाला, काळं मीठ आणि लिंबाचा रस टाकून एकत्र करा.
- गॅसवर तवा गरम करत ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर काही तेलाचे थेंब टाकून गॅसचा फ्लो कमी करा. तव्यावर पापड भाजून घ्या.
- पापड व्यवस्थित भाजल्यानंतर त्यावर तयार कलेले टॉपिंग्स टाका.
- टॉपिंग व्यवस्थित टाकल्यानंतर त्यावर शेव टाका.
- मसाला पापड खाण्यासाठी तयार आहे.
- पापड तयार केल्यानंतर लगेच खाण्यासाठी द्या. अन्यथा पापड नरम होतो.
- अत्यंत कमी वेळात चटपटीत असा मसाला पापड खाण्यासाठी तयार आहे.