घरच्या घरी तयार करा टेस्टी सिताफळ आइस्क्रिम!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 04:56 PM2018-10-24T16:56:56+5:302018-10-24T16:57:43+5:30
सध्या सिताफळांची बाजारामध्ये रेलचेल सुरू झाली आहे. सध्या हाजारामध्येही सिताफळांपासून तयार करण्यात आलेले पदार्थ पहायला मिळतात. अनेकांना खूप बिया असल्यामुळे सिताफळ खाण्याचा कंटाळा येतो.
सध्या सिताफळांची बाजारामध्ये रेलचेल सुरू झाली आहे. सध्या हाजारामध्येही सिताफळांपासून तयार करण्यात आलेले पदार्थ पहायला मिळतात. अनेकांना खूप बिया असल्यामुळे सिताफळ खाण्याचा कंटाळा येतो. परंतु ते आपली सिताफळ खाण्याची हौस सिताफळ बासुंदी किंवा रबडी खाऊन भागवतात. तुम्हालाही फक्त सिताफळ खायला कंटाळा येत असेल तर आज आम्ही तुम्हाला सिताफळापासून तयार होणारी एक हटके रेसिपी सांगणार आहोत. जाणून घेऊयात सिताफळ आइस्क्रिम तयार करण्याची रेसिपी....
साहित्य :
- सिताफळाचा गर - 4 कप
- फ्रेश क्रिम - एक कप
- दूध पावडर - दीड कप
- साखर - अर्धा कप
- वेनिला इसेंस
- दूध - अडिच कप
कृती :
- सर्वात आधी एका पॅनमध्ये दूध उकळवत ठेवा आणि ते आटवून घ्या. त्यानंतर ते थंड करण्यासाठी बाजूला ठेवा.
- दूध थंड झाल्यानंतर त्यामध्ये साखर, दूधाची पावडर, वेनिला इसेंस, क्रिम टाका आणि मिश्रण एकत्र करून घ्या.
- मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये सिताफळाचा गर मिक्स करा. - तयार मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून फ्रिजरमध्ये ठेवा.
- 1 तासानंतर फ्रिजमधून बाहेर काढा. व्यवस्थित फेटून घ्या आणि त्यामध्ये क्रिम मिक्स करा.
- त्यानंतर तयार मिश्रण आइस्क्रिम कंटेनरमध्ये टाकून फ्रिजरमध्ये 40 ते 45 मिनिटांसाठी फ्रिजरमध्ये ठेवा.
- मस्त थंडगार सिताफळ आइस्क्रिम तयार आहे.