नको रे बाबा! पालकाच्या भाजीला मुलं नाक मुरडतात? पालक न खाणारेही आवडीने खातील 'हा' पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 11:41 AM2019-12-04T11:41:33+5:302019-12-04T11:53:19+5:30
घराघरातील मुलं ही पालेभाज्या खाण्यासाठी नाक मुरडतात. त्यामुळे रोज काय वेगळं तयार करून डब्याला द्यायचं असा प्रश्न स्त्रीयांना पडलेला असतो.
घराघरातील मुलं ही पालेभाज्या खाण्यासाठी नाक मुरडतात. त्यामुळे रोज काय वेगळं तयार करून डब्याला द्यायचं. असा प्रश्न स्त्रीयांना पडलेला असतो. पालेभाज्या करून देण्यापेक्षा त्यांच भाज्यांपासून काही वेगळं केलं तर मुलं आणि घरातील मंडळी नक्की आवडीने खातील. कारण बाहेरच्या चटकदार पदार्थाच्या तुलनेत मुलांना घरची पालकाची भाजी खायला मुलीच आवडत नाही. चला तर मग जाणून घेऊया. पालक आणि कडधान्यापासुन कबाब कसे तयार करायचे. ही रेसीपी मुलं आवडीने खातील आणि त्यातून त्य़ांना पौष्टीक शरीरासाठी आवश्यक असणारे घटक मिळतील.
पालक चवळी कबाब रोल बनवण्यासाठी साहित्य
भिजवलेली चवळी १ कप
पालकाची पान २०-२५
अद्रक १ टि स्पून
मिरची ४-५
जिरं १ टि स्पून
ओवा १/२ टि स्पून
गरम मसाला १टि स्पून
धणेपूड १/२ टि स्पून
आमचूर १/२ टि स्पून
मिरची पावडर १ टि स्पून
कोथिंबीर १/२ कप
मीठ चवीनुसार
रोल बनवण्यासाठी
पराठे आवश्यकतेनुसार
दही पुदिना चटणी
कांदा, कोबी, गाजर, टोमॅटो आवश्यकतेनुसार
टोमॅटो सॉस आवश्यकतेनुसार
कृती-
रात्रभर भिजवलेली चवळी सकाळी उपसून घ्यावी. पालक चंगला धुवून घ्यावा.
कुकर मध्ये चवळी, पालकाची पान आणि चवळी शिजेल एवढेच पाणी घालून २-३ शिट्या काढून घ्या.
कुकर थंड झाल्यावर चवळी, पालकमध्ये पाणी शिल्लक राहिल्यास ते काढून घ्यावं.
मिक्सरच्या भांड्यात चवळी, अद्रक, मिरची, जिरं सरबरीत वाटून घ्यावयाचे.
मोठ्या बाउलमध्ये चळवळीचे वाटण, पालक , सर्व मसाले, कोथिंबीर व मीठ घालून छान एकजीव करावे मिश्रण.
मिश्रण थोडे ओलसर वाटल्यास वरून १-२ चमचे बेसन पीठ घालून गोळा तयार करून घ्यावा.
आता मिश्रणाचे हव्या तेवढ्या आकाराचे कबाब वळून घ्यावे आणि तव्यावर थोड्या तेलात फ्राय करून घ्यावे.(डीप फ्राय चालतील)
रोल बनवण्यासाठी पराठा घेऊन त्यावर दही पुदिना चटणी लावून वरून कबाब ठेवावे व कांदा, कोबी ने सजवावे.
अशा प्रकारे सर्व रोल बनवून घ्यावे. व टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावे.
(सौजन्य- betterbutter)