जेवणाची टेस्ट वाढवणासाठी ट्राय करा हटके स्टाइल 'या' चटणी रेसिपी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 01:12 PM2019-08-15T13:12:00+5:302019-08-15T13:12:13+5:30
चटणी म्हणजे, भारतीय खाद्यसंस्कृतीमधील एक महत्त्वाचा पदार्थ. साधारणतः प्रत्येक घरामध्ये जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी वेगवेगळे खाण्याचे पदार्थ तयार करण्यात येतात. जेवणाची चव वाढविण्यासाठी चटणी मदत करते.
चटणी म्हणजे, भारतीय खाद्यसंस्कृतीमधील एक महत्त्वाचा पदार्थ. साधारणतः प्रत्येक घरामध्ये जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी वेगवेगळे खाण्याचे पदार्थ तयार करण्यात येतात. जेवणाची चव वाढविण्यासाठी चटणी मदत करते. घरामध्ये झटपट होणारी खोबऱ्याची चटणी, कोथिंबीर पुदिन्याची चटणी यांसारख्या सहज-सोप्या चटण्या तयार करण्यात येतात. पण याव्यतिरिक्त इतरही अनेक प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या चटणी तयार करू शकता. या तुम्ही इडली, डोसा, उत्तपा इत्यादी पदार्थांसोबत सर्व्ह करू शकता. याव्यतिरिक्त पराठा, मोमोज्, सॅन्डविच, कचोरी इत्यादी पदार्थांसोबत खाण्यासाठीही तुम्ही या चटणी खाऊ शकता.
टॉमेटो आणि कांद्याची चटणी
साहित्य :
- टोमॅटो
- कांदा
- उडदाची डाळ
- सुकलेल्या लाल मिरच्या
- चिंच
- राय
- कढिपत्ता
- तेल
- मीठ
कृती :
- कढईमध्ये तेल गरम करा. त्यामध्ये सुकलेल्या लाल मिरच्या, उडदाची डाळ एकत्र करून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. यामध्ये कांदा आणि मीठ 2 ते 3 मिनिटांपर्यंत भाजून घ्या.
- चिंच आणि टोमॅटो एकत्र करून मुलायम होइपर्यंत परतून घ्या. त्यानंतर तयार पेस्ट बाउलमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवा.
- पेस्ट थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारिक करा.त्यामधअये आवश्यकतेनुसार पाणी एकत्र करा.
- कढईमध्ये एक छोटा चमचा तेल गरम करून राय, मीठ आणि कढिपत्त्याची फोडणी द्या.
मिरची-चिंचेची लाल चटणी
साहित्य :
- कांदा
- लसूण
- कश्मिरी सुख्या लाल मिरच्या
- चिंच
- चण्याची डाळ
- तेल
- मीठ
कृती :
- कश्मिरी लाल मिरच्या आणि चिंचेच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवा. कढईमध्ये तेल गरम करा. यामध्ये कांदा आणि लसूण एकत्र करून 15 मिनिटांपर्यंत भाजून घ्या.
- जेव्हा हे मिश्रण मुलायम होईल तेव्हा एका प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करा. आता मिक्सरमध्ये भाजलेला कांदा, लसूण, भाजलेली चण्याची डाळ, मीठ, भिजवेल्या लाल मिरच्या आणि चिंचेचं पाणी एकत्र करून बारिक वाटून घ्या.
ग्रीन कोकनट चटणी
साहित्य :
- खोबरं
- चण्याची डाळ
- हिरवी कोथिंबीर
- हिरव्या मिरच्या
- लिंबाचा रस
- तेल
- राय
- लाल मिरच्या
- मीठ
- कढिपत्ता
साहित्य :
- मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेलं खोबरं, चण्याची डाळ, हिरवी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करून बारिक वाटून घ्या. चटणी बाउलमध्ये काढून घ्या.
- एका कढईमध्ये फोडणी देण्यासाठी तेल गरम करून घ्या. त्यामध्ये राय आणि लाल मिरच्या टाका. मिरच्यांचे दोन तुकडे करून टाका. फोडणी तडतडल्यावर चटणीला तडका द्या.