फक्त 10 मिनिटांमध्ये तयार करा पौष्टिक हळदीचं सूप!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 04:10 PM2018-12-24T16:10:40+5:302018-12-24T16:12:23+5:30

आजीबाईच्या बटव्यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट करण्यात येणारी हळद वेगवेगळ्या गंभीर आजारांवर रामबाण उपाय ठरते. हळद केवळ पदार्थांना रंग आणि चव देण्यासाठीच नव्हे तर आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

How To Make Turmeric Soup Or Receipe of Turmeric soup | फक्त 10 मिनिटांमध्ये तयार करा पौष्टिक हळदीचं सूप!

फक्त 10 मिनिटांमध्ये तयार करा पौष्टिक हळदीचं सूप!

Next

आजीबाईच्या बटव्यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट करण्यात येणारी हळद वेगवेगळ्या गंभीर आजारांवर रामबाण उपाय ठरते. हळद केवळ पदार्थांना रंग आणि चव देण्यासाठीच नव्हे तर आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. हळद तुम्हाला कॅन्सर, हृदयरोग, डायरीया, कावीळ आणि सर्दी-खोकला या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठीही मदत करते. थंडीमध्ये तर आरोग्य चांगलं राखण्यासाठी हळदीचे अनेक उपयोग आहेत. शरीरातील विषारी तत्व बाहेर टाकून रक्त शुद्ध करण्यासाठी हळद मदत करते. 

हळदीपासून अनेक आरोग्यदायी पदार्थही तयार करण्यात येतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक हटके आणि आरोग्यदायी पदार्थ सांगणार आहोत. थंडीमध्ये उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी हा पदार्थ नक्कीच मदत करेल. जाणून घेऊया हळदीपासून सुप तयार करण्याची सोपी रेसिपी. शरीराला उष्णता आणि अनेक पौष्टिक घटक देण्यासाठी हे सुप गुणकारी ठरतं. 

साहित्य :

चार कप व्हेजिटेबल सूप

काळी मिरी पावडर 

कच्ची हळद

कृती :

- सर्वप्रथम कच्ची हळद मिक्सरमध्ये बारिक करून घ्या. 

- त्यानंतर एक पॅन ठेवून त्यामध्ये व्हेजिटेबल सूप गरम करत ठेवा.

- व्हेजिटेबल सूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये हळद एकत्र करा. 

- साधारणतः 15 मिनिटांपर्यंत गॅसवर शिजवून घ्या. 

- तयार सूप गाळून घ्या आणि वरून काळी मिरी पावडर टाका.

- गरमा गरम पौष्टिक हळदीचं सूप तयार आहे. 

Web Title: How To Make Turmeric Soup Or Receipe of Turmeric soup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.