केळ्यांमध्ये किती असतात पोषक तत्त्वे आणि रोज केळी खाण्याचे काय होतात फायदे?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 09:59 AM2018-10-03T09:59:15+5:302018-10-03T13:29:40+5:30
केळी जगात सर्वात जास्त खाल्लं जाणारं फळ असल्याचं तुम्हाला माहीत आहे का? जगातल्या जवळपास १०७ देशांमध्ये केळीची लागवड केली जाते आणि यापेक्षा जास्त देशांमध्ये लोक केळी खाणं पसंत करतात.
केळी जगात सर्वात जास्त खाल्लं जाणारं फळ असल्याचं तुम्हाला माहीत आहे का? जगातल्या जवळपास १०७ देशांमध्ये केळीची लागवड केली जाते आणि यापेक्षा जास्त देशांमध्ये लोक केळी खाणं पसंत करतात. याचं कारण या फळामध्ये असलेले भरपूर पोषक तत्वे, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. या सर्व गोष्टींमुळे शरीराला लगेच एनर्जी मिळते. अनेक शोधांमधून हे समोर आले आहे की, केळी खाल्याने अस्थमा, कॅन्सर, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हृदय रोग आणि पोटाच्या वेगवेगळ्या समस्यांपासून बचाव केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया केळीचे आरोग्यदायी फायदे...
पोषक तत्वे
जर तुम्ही 115 ग्रॅम केळींच सेवन केलं तर त्यातून तुम्हाला इतके पोषक तत्वे मिळतात की, तुम्ही हैराण व्हाल.
110 कॅलरी
30 ग्रॅम कार्बोहायड्रेट
1 ग्रॅम प्रोटीन
0.3 मिलीग्रॅम मॅग्नीज
450 मिलीग्रॅम पोटॅशियम
34 मिलीग्रॅम मॅग्नेशियम
0.3 मिलीग्रॅम आयर्न
0.1 मिलीग्रॅम रायबोफ्लेविन
0.8 मिलीग्रॅम नियासिन
81 इंटरनॅशनल यूनिट व्हिटॅमिन ए
0.5 मिलीग्रॅम व्हिटॅमिन बी-6
9 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी
3 ग्रॅम डाइट्री फायबर
25 मायक्रोग्रॅम फॉलेट
यासोबतच केळींची खासियत म्हणजे यात फॅट, कोलेस्ट्रॉल आणि सोडियम अजिबात नसतं. तर पोटॅशिअमचं प्रमाण भरपूर असतं. एका व्यक्तीला एका दिवसात ४७०० मिलीग्रॅम पोटॅशिअमची गरज असते.
केळी खाल्याने हृदय रोग दूर राहतात
केळी हृदय रोगाने ग्रस्त लोकांसाठी फार फायदेशीर असतात. नियमीत रुपाने केळी खाल्याने शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो. या कारणाने केळी खाल्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी होते. तसेच यात आयर्न भरपूर प्रमाणात असतं, ज्या कारणाने रक्तात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. दररोज दोन केळी खाणाऱ्यांना हृदय रोग आणि पचनक्रियेसंबंधी समस्या होत नाही.
केळी खाल्याने डोकं शांत राहतं
तणाव किंवा डिप्रेशन झालं असेल तर केळीचं सेवन करा. एका शोधातून हे समोर आलं आहे की, केळी खाल्याने तणाव आणि डिप्रेशनपासून सुटका मिळते. कारण केळींमध्ये प्रोटीन आणि अनेक अॅंटीऑक्सिडेंट्स आढळतात जे डोकं शांत करतात.
ब्लड प्रेशर राहतं कंट्रोल
केळीचं सेवन नियमीतपणे केल्याने ब्लड प्रेशर सामान्य राहतं. यात पोटॅशिअम आढळतं जे ब्लड प्रेशरमुळे होणाऱ्या हार्ट अटॅकचा धोका कमी करतात. तसेच याने हायपरटेंशनची समस्याही नियंत्रित राहते.
लहान मुलांसाठी आणि वयोवृद्धांसाठी फायदेशीर
लहान मुलांच्या विकासाठी केळी फार फायदेशीर आहे. केळीमध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन आढळतात ज्यामुळे मुलांचा विकास चांगला होतो. त्यामुळे लहान मुलांना नियमीत केळी द्यायला हवीत. तसेच केळी वयोवृद्धांसाठीही फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन सी, बी ६ आणि फायबर आढळतात जे वाढत्या वयात गरजेचे असतात.