बाजारातून ताज्या भाज्या विकत घेण्यासाठी 'या' टिप्सचा वापर करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 01:05 PM2018-08-19T13:05:54+5:302018-08-19T13:39:48+5:30
आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये विविधता आढळून येते. भारतीय खाद्यसंस्कृतीनुसार आपल्या जेवणामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश होतो. त्यामध्ये प्रामुख्याने भाज्यांचा समावेश करण्यात येतो.
आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये विविधता आढळून येते. भारतीय खाद्यसंस्कृतीनुसार आपल्या जेवणामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश होतो. त्यामध्ये प्रामुख्याने भाज्यांचा समावेश करण्यात येतो. दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं आपल्या जेवणामध्ये एखाद्यातरी भाजीचा समावेश करण्यात येतो. पण या भाज्या बाजारातून विकत आणताना अनेक लोकं ताज्या भाज्यांची निवड करताना गोंधळ घालतात. अनेकदा बाजारात असणाऱ्या इतक्या भाज्यांपैकी ताजी कशी निवडावी याबाबत अनेकांना माहीत नसतं. अशातच गोंधळून जाऊन अनेक जण सडलेल्या किंवा किड लागलेल्या भाज्या खरेदी करतात. त्यासाठी आपण जाणून घेऊयात अशा काही स्टेप्स ज्यांच्या मदतीने तुम्हाला ताज्या भाज्यांची निवड करताना मदत होईल. यामुळे तुम्ही फक्त स्मार्ट शॉपिंगच करू शकणार नाही तर तुमच्या कुटुंबालाही चांगल्या आणि ताज्या भाज्यां खायला घालू शकता.
1. फ्लॉवर
भाजीसाठी फ्लॉवर खरेदी करताना पांढरा रंग असलेल्याचीच निवड करा. पिवळा पडलेला फ्लॉवर घेणं टाळा. तसेच किड आहे की नाही हे तपासून पहा. खराब झालेल्या फ्लॉवरमधून दुर्गंध येतो.
2. कोबी
बाजारातून कोबी खरेदी करताना हिरवा बघून घ्यावा. तसेच कोबी भरीव आहे याची खात्री करून घ्या. चांगला कोबी आकाराने छोटा, पण वजनाला जास्त असतो तर फ्लॉवर आकाराने मोठा आणि वजनाने कमी असतो. कोबी घेताना त्यावर जर छिद्र असतील तर तो कोबी घेऊ नका. कोबीवर असलेल्या छिद्रांचा अर्थ म्हणजे त्याला किड लागलेली आहे असा होतो.
3. ब्रोकली
ब्रोकली हा फ्लॉवरच्याच भाजीचा एक प्रकार आहे. ती हिरव्या रंगाची असते. त्यामुळे खरेदी करतानाचा फ्लॉवरच्या भाजीसारखीच काळजी घेणं गरजेचं आहे. ब्रोकली हिरवीगार असावी, ती पिवळी किंवा काळी पडलेली नसावी.
4. दुधी भोपळा
दुधी भोपळा खरेदी करताना त्याचा आकार मध्यम आणि बारिक असला पाहिजे. जास्त मोठ्या आकाराचा दुधी घेणं टाळावं. मध्यम आकाराची सरळ असलेला दूधी घ्यावा. तसेच पूर्ण दुधी हा वरून हिरव्या रंगाचा असला पाहिजे त्यावर पांढरे किंवा पिवळे निशाण असतील तर तो दुधी घेणं टाळा. जास्त पिकलेला दुधी असेल तर त्यातील बिया कडक असतात आणि तो खाण्यासही चवीष्ट नसतो. त्यामुळे शक्यतो कोवळा दुधी खरेदी करा. दुधीची भाजी करताना किंवा दुधीचा रस करताना दुधी थोडा चाखून पहा. कडवट असलेला दुधी शरीरासाठी घातक असतो.
7. तोंडली
तोंडली खरेदी करताना ती भरीव असेल याची खात्री करून घ्या. भरली तोंडली करायची असेल तर मध्यम आकाराची तोंडली खरेदी करा.
8. वांगी
बाजारात आपल्याला अनेक प्रकारची वांगी मिळतात. लांब, गोल, हिरवी तसचे भरताची वांगी आढळून येतात. भरली वांगी करायची असतील तर गोल आणि मोठ्या आकाराची वांगी विकत घ्यावी. वांगी कापून भाजी बनवायची असेल तर लांब आकाराची वांगी घ्यावी. वांगी घेताना त्यावर छिद्र असलेली वांगी घेऊ नका. अशा वांग्यांच्या आतमध्ये किडे असतात.