फळ आणि भाज्यांवरून पेस्टीसाइड्स कसे दूर करावे?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 10:03 AM2019-04-30T10:03:13+5:302019-04-30T10:07:56+5:30
हे आपणा सर्वांनाच माहीत आहे की, बाजारात मिळणारी फळ आणि भाज्या पेस्टीसाइडयुक्त असतात. आजकाल कीटकनाशक औषधांचा आणि रसायनिक खतांचा अधिक वापर केला जातो.
(Image Credit : Daily Express)
हे आपणा सर्वांनाच माहीत आहे की, बाजारात मिळणारी फळ आणि भाज्या पेस्टीसाइडयुक्त असतात. आजकाल कीटकनाशक औषधांचा आणि रसायनिक खतांचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे कितीही पौष्टिक भाज्या असल्या तरी त्या कीटकनाशक औषधांमुळे अधिक नुकसानकारक होतात. बाजारात काही अशाही पेस्टीसाइडचा वापर केला जातो ज्याने फळं किंवा भाज्या चमकदार दिसतात.
(Image Credit : Goodnet)
भाज्या किंवा फळं चमकवण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ असे पेस्टीसाइड असतात ज्यामुळे कॅन्सरसारखा आजारही होऊ शकतो. त्यामुळे फळं किंवा भाज्या केवळ पाण्याने धुवून पूर्णपणे स्वच्छ किंवा खाण्याजोग्या होत नाहीत. फळ आणि भाज्या चांगल्याप्रकारे स्वच्छ करण्यासाठी खास पद्धत वापरावी लागते.
फळं आणि भाज्यांमधून पेस्टीसाइड्स काढण्याची पद्धत
(Image Credit : www.homeanddecor.com.sg)
फळं आणि भाज्या जर केवळ पाण्याने स्वच्छ करत असाल तर हे घातक ठरू शकतं. पाण्याने फळं आणि भाज्यांवरील धूळ-माती तर स्वच्छ होते, पण पेस्टीसाइड आणि कीटकनाशक औषधांचा प्रभाव पूर्णपणे दूर होत नाही. एक्सपर्ट सांगतात की, पेस्टीसाइड योग्यप्रकारे स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिश्रित करुन भाजी किंवा फळं स्वच्छ करणे अधिक चांगलं ठरेल.
काय सांगतो शोध?
जर्नल ऑफ अॅग्रीकल्चर अॅन्ड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, बेकिंग सोड्याचा वापर करुन कीटकनाशक आणि पेस्टीसाइड्सचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. बेकिंग सोडा पाण्यात टाकून त्यात फळं आणि भाज्या एक मिनिटांसाठी ठेवल्या तर पेस्टीसाइड्सचा प्रभाव दूर होतो. जर जास्त पेस्टीसाइड्सचा उपयोग केला गेला असेल तर पाणी बेकिंग सोड्यामध्ये फळं आणि भाज्या १० ते १५ मिनिटांसाठी भिजवून ठेवाव्यात.
बेकिंग सोड्याने फायदा कसा होतो?
(Image Credit : Indiatimes.com)
बेकिंग सोडा एकप्रकारे सोडियम बायकार्बोनेट असतं, जे कीटकनाशक औषधे आणि पेस्टीसाइड्सला स्वच्छ करण्याच्या कामात येतं. पेस्टीसाइड्सचं सर्वात प्रचलित रुप थायबेंडाजोल आणि फॉस्फेट याने सहजपणे स्वच्छ करता येतं. पण काही फळांच्या आता फळं लवकर पिकण्यासाठी किंवा रोग नष्ट करण्यासाठी कीटकनाशक औषध इंजेक्ट केलं जातं. हे कीटकनाशक बेकिंग सोड्याच्या मदतीने साफ केलं जाऊ शकत नाही.