तुम्ही भेसळयुक्त मसाला तर वापरत नाही ना? एक ग्लास पाण्याने 'अशी' चेक करा शुद्धता!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 12:16 PM2024-10-30T12:16:09+5:302024-10-30T12:17:09+5:30
Adulteration in Spices : काही मसाले खाल्ल्याने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराही देखील धोका असतो. त्यामुळे काही मसाल्यांवर बंदीही घालण्यात आली आहे.
Adulteration in Spices : भारतात मसाल्यांशिवाय कोणत्याही पदार्थांची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. रोज जेवणात किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांमुळे पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही फायदे मिळतात. कारण मसाल्यांमध्ये अॅंटी-इन्फ्लामेटरी, अॅंटी-ऑक्सिडेंट, अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-वायरल, अॅंटी-फंगल तत्व असतात. पण काही मसाले खाल्ल्याने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराही देखील धोका असतो. त्यामुळे काही मसाल्यांवर बंदीही घालण्यात आली आहे.
FSSAI ने भारतात काही मसाल्यांवर बंदी घातली आहे. त्यात आर्टिफिशियल कलर, स्टार्च, चॉक पाउडर आणि इतर काही गोष्टींचा समावेश आहे. यांचं सेवन केल्याने स्किन एलर्जी, लिव्हरची समस्या आणि आरोग्यासंबंधी इतरही समस्या होतात. खुल्या मसाल्यांची विक्री सुद्धा बॅन आहे. मात्र, तरीही गाव-खेड्यांमध्ये हे मसाले विकले जातात. या खूप भेसळ केली जाते.
जर तुम्हीही खुले मसाले खरेदी केले असतील तर चिंता करू नका. केवळ एक ग्लास पाण्याच्या पदतीने तुम्ही या मसाल्यांची शुद्धता चेक करू शकता. न्यूट्रिशनिस्ट राजमणि पटेल यांनी याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात मसाल्यांमधील भेसळ कशी ओळखावी याची ट्रिक सांगितली आहे.
लाल मिरची पावडर
एक ग्लास पाण्यात एक चमचा लाल मिरची पाडवर टाका. जर ग्लासमध्ये लाल मिरची पावडर जास्त गर्द रंग सोडत असेल तर यात आर्टिफिशिअल रंगाचा वापर केलेला असू शकतो. जर लाल मिरची पावडर ग्लासमध्ये खाली जाऊन बसत असेल आणि रंग कमी सोडत असेल तर मिरची पावडर शुद्ध आहे.
हळद
एक ग्लास पाण्यात १ चमचा हळद पाडवर टाका. शुद्ध हळद ग्लासमध्ये खाली जमा होऊन हलका रंग सोडते. जर आर्टिफिशियल रंग मिक्स केलेला असेल तर हळदीचा रंग गर्द दिसतो.
पीठ
एक ग्लास पाण्यात एक चमचा पीठ टाका. शुद्ध पीठ सहजपणे ग्लासच्या बुडाला जाऊन बसतं. जर यात चोकर किंवा दुसरा काही पदार्थ भेसळ केला असेल तर पीठ पाण्यावर तरंगतं.
काळी मिरे
एक ग्लास पाण्यात १ चमचा अख्खे काळी मिरे टाका. शुद्ध काळी मिरे ग्लासमध्ये खाली बसतील. जर त्या पपईच्या बीया किंवा खराब क्वालिटीचे दाणे असतील ते पाण्यावर तरंगतील.