थंडीत प्यायचाय एकदम कडक चहा? जाणून घ्या घरीच कसा तयार कराल चहाचा खास मसाला!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 10:27 AM2024-11-30T10:27:05+5:302024-11-30T10:27:57+5:30
म्हाला हवं तर तुम्ही कडक चहाचा मसाला एकदाच बनवून ठेवू शकता. घरीच हा कडक चहाचा मसाला तयार करण्याची ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भारतात जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात गरमागरम चहाने होते. चहा घेतल्याशिवाय अनेकांचं कशातही मन लागत नाही. थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात तर चहाचं अधिक सेवन केलं जातं. लोक वेगवेगळ्या प्रकारचा चहा पिणं पसंत करतात. कुणाला दुधाचा मसाला असलेला चहा आवडतो तर कुणाला काळा किंवा गुळाचा चहा आवडतो.
हिवाळ्यात खासकरून कडक चहाची खूप डिमांड असते. मात्र, कडक चहा बनवणं इतकंही सोपं नसतं. कारण यासाठी वेगवेगळे मसाले हवे असतात. तुम्हाला हवं तर तुम्ही कडक चहाचा मसाला एकदाच बनवून ठेवू शकता. घरीच हा कडक चहाचा मसाला तयार करण्याची ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कडक चहाचा मसाला बनवण्यासाठी साहित्य
10-12 लवंग, 12-14 वेलची, 7-9 काळी मिरी, 2 मोठे चमचे बडीशेप, एक इंच, सुकलेलं आलं, एक इंच दालचीनी, 5-8 तुळशीची पाने, 3-4 जायफळ.
कसा बनवाल मसाला?
चहाचा मसाला तयार करण्यासाठी मसाले भाजून घ्या. यासाठी एक पॅन गरम करा त्यात आधी लवंग २ मिनिटे भाजा. सुगंध आल्यावर गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढा. आता काळी मिरी भाजून प्लेटमध्ये काढा. अशाप्रकारे सगळे मसाले भाजून घ्या. जर सूंठ आणि जायफळाचं पावडर घेतलं असेल तर ते वेगळं काढा. सगळे मसाले थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करा. त्यात जायफळ आणि सूंठाचं पावडर टाका. तुमचा चहाचा मसाला तयार आहे.
कसा स्टोर कराल?
चहाचा मसाला स्टोर करतेवेळी काही गोष्टींची काळजी घ्या. जेणेकरून तो लवकर खराब होणार नाही. मसाला एखाद्या एअर टाइट कंटेनरमध्ये थंड जागेवर ठेवा. मसाला काढतानाही भिजलेले हात किंवा चमच्याचा वापर करू नये. मसाला जास्त वेळ उघडा ठेवाल तर त्याची फ्रेशनेस आणि फ्लेवर उडून जाईल.
चहात किती टाकावा?
चहामध्ये मसाला टाकल्याने चहाला एक वेगळी टेस्ट येते. मात्र, हे लक्षात ठेवा की, टेस्ट चांगली लागते म्हणून मसाल्याचा खूप जास्त वापर करू नये. असं केल्यास चहा बिघडू शकतो. एक कप चहामध्ये केवळ चिमुटभर मसाला टाकावा.