नेहमीचा ठेचा, चटणी खाऊन कंटाळलात? घरीच बनवा चटकदार राजस्थानी लसूण चटणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 03:41 PM2024-07-19T15:41:03+5:302024-07-19T15:50:50+5:30
Rajasthani garlic chutney : चटणी टेस्ट ही तोंडाला पाणी सोडणारी असते. आज अशाच एक खास चटणीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही चटणी म्हणजे राजस्थानी लसूण चटणी.
Rajasthani garlic chutney : भारत देश खाण्या-पिण्याच्या वेगवेगळ्या पदार्थांसाठी जगभरात फेमस आहे. महाराष्ट्रातील हिरव्या मिरच्यांचा ठेचा किंवा तिळाची चटणी किंवा लसूण खोबऱ्याची चटणी तर तुम्ही अनेकदा चाखली असेल. अनेक लोकांचं तर या चटण्यांशिवाय जेवणच पूर्ण होत नाही. वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या चटण्या वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाल्ल्या जातात. कुठे चपातीसोबत, कुठे समोस्यासोबत तर कुठे आणखी कशासोबत. चटणी टेस्ट ही तोंडाला पाणी सोडणारी असते. आज अशाच एक खास चटणीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही चटणी म्हणजे राजस्थानी लसूण चटणी.
राजस्थानी लसूण चटणी
चपाती, पुर, कचोकी आणि दाल बाटीची टेस्ट वाढवणारी खास राजस्थानी लसूण चटणी बनवणं फारच सोपं काम आहे. ही चटणी तुम्ही घरी सहज तयार करू शकता आणि याचा आनंद घेऊ शकता. ही चटणी खाऊन तुम्ही जेवणात एक वेगळी टेस्ट आणू शकता. नेहमीच्या चटणी सोडून ही चटणी तुम्हाला नक्कीच आवडेल.
चटणीसाठी लागणारं साहित्य
- अर्धा कप लसूण
- 2 इंच कापलेलं आलं
- 6 ते 8 काश्मीरी लाल मिरच्या
- भिजवलेली चिंच 2 चमचे
- काळी मिरची सुकलेली 5 ग्राम
- तेल 1/3 कप
- जिरे 1 चमचा
- मीठ 1/2 चम्मच
चटणी बनवण्याची प्रक्रिया
सगळ्यात आधी लसूण, आलं, काश्मीरी लाल मिरच्या, काळ्या मिरच्या, तेल आणि जिऱ्याची थोडं पाणी घेऊन मुलायम पेस्ट तयार करा. आता एका भांड्यात थोडं मोहरीचं तेल टाका, त्याला राईचा तडका द्या. तकड्यानंतर त्यात तयार केलेली पेस्ट टाका. वरून त्यात चिंचेचा रस आणि मीठ टाका. थोडा वेळ चटणी हलक्या आसेवर होऊ द्या. काही वेळात चटणीची कच्चेपणाची टेस्ट निघून जाईल. जर कच्चेपणाची टेस्ट निघून गेली असेल तर समजा तुमची राजस्थानी लसूण चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही रोज जेवणासोबत खाऊ शकता किंवा पराठयांसोबतही खाऊ शकता. ही चटणी तुम्ही स्टोर करूनही ठेवू शकता.