लग्नाच्या मेजवानीत सोन्याचा भात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 05:28 PM2017-09-04T17:28:58+5:302017-09-04T17:36:09+5:30

भारतीय विवाह सोहळ्यात सोन्याची एक महत्वपूर्ण जागा आहे. परंतु, केवळ दागिने, भेटवस्तू यापुरतेच सोने आता मर्यादित राहिलेले नाही. तर हे सोने जाऊन पोहोचलेय थेट विवाहातील पंक्तींमध्ये. हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या एका विवाह समारंभात पाहुण्यांना चक्क सोन्याचा भात सर्व्ह करण्यात आला

In Hyderabad shafe gives golden surprise. He served golden rice in wedding ceremony | लग्नाच्या मेजवानीत सोन्याचा भात.

लग्नाच्या मेजवानीत सोन्याचा भात.

ठळक मुद्दे* हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या एका विवाह समारंभात पाहुण्यांना चक्क सोन्याचा भात सर्व्ह करण्यात आला.* या सोन्याची भाताची कल्पना हैदराबादमधील प्रसिद्ध शेफ व्ही साई राधाक्रि ष्ण यांना सुचली.* भातावर सर्व्ह करण्यासाठी 24 कॅरट सोन्याचा वर्ख वापरण्यात आला. पानावर गरमगरम भात वाढला की लगेच हा वर्ख वाढला जात होता.

- सारिका पूरकर-गुजराथी


भारतीय विवाह सोहळा म्हटला की भव्य मंडप सजावट, रोषणाई, संगीत मैफली, भरजरी कपड्यांचा थाट हे सगळे ओघानं आलंच. याव्यतिरिक्त भारतीय विवाह सोहळ्याचे आणखी एक कनेक्शन आहे, ते म्हणजे सोनं. सोने या मूल्यवान, प्रतिष्ठा वृंद्धिंगत करणा-या धातूशिवाय भारतीय विवाह सोहळा नक्कीच अपूर्ण राहील.
डोक्यापासून पायापर्यंत नववधूला सोन्याच्या दागिन्यात मढवून तिचा सन्मान केला जातो. सोन्याचे दागिने म्हणजे तिच्यासाठी केवळ श्रुंगार राहात नाही तर अनेकांचे आशीर्वाद बनून जातात. कारण भारतात मुलीच्या मामांनी तिच्या लग्नात भाचीकरिता साड्या, दागिने भेट म्हणून देण्याची प्रथा आहे. मामा मोशावळा म्हणूनही या प्रथेस संबोधलं जातं. मामानं दिलेले हे सोन्याचे दागिने, साड्या लग्नमंडपात दिमाखात मिरवले जातात. सांगायचे तात्पर्य हेच की, भारतीय विवाह सोहळ्यात सोन्याची एक महत्वपूर्ण जागा आहे. परंतु, केवळ दागिने, भेटवस्तू यापुरतेच सोने आता मर्यादित राहिलेले नाहीये बरं का !!!
होय, तर हे सोने जाऊन पोहोचलेय थेट विवाहातील पंक्तींमध्ये..हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या एका विवाह समारंभात पाहुण्यांना चक्क सोन्याचा भात सर्व्ह करण्यात आला.आत्ता बोला!

विवाहासारखा मंगल सोहळा नेहमीच संस्मरणीय व्हावा, आलेले पाहुण्यांना साग्रसंगीत मेजवानी देता यावी याकरिता भारतात अनेक प्रयत्न केले जातात. असाच हा एक प्रयत्न होता. व्हॉट्स अ‍ॅप आणि अन्य सोशल मीडियावर या लग्नातील सोन्याच्या भाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. त्यामुळे हा सोन्याचा भात चर्चेचा विषय बनला आहे. नाव जरी सोेन्याचा भात असला तरी सोने टाकून तो शिजवलेला नाहीये. या व्हिडिओत असं दिसतंय की केळीच्या पानावर भात वाढल्यानंतर त्यावर वाढपी सोन्याचा वर्ख ठेवतोय. त्यावर मग रस्सम, सांबर ओतला जातोय.

 



शेफ साई यांची कल्पना

या सोन्याची भाताची कल्पना हैदराबादमधील प्रसिद्ध शेफ व्ही साई राधाक्रि ष्ण यांना सुचली. ते म्हणतात की, ‘या लग्नात काहीतरी वेगळं खानपान देण्याची इच्छा माझ्या क्लायंटनं व्यक्त केली होती. त्यामुळे काय करता येईल असा विचार केला असता ही कल्पना सुचली. आपल्याकडे एरवी आपण चांदीच्या वर्खात गुंडाळलेली मिठाई खातोच शिवाय सुवर्णप्राशन विधी देखील लहान मुलांसाठी करण्याची प्रथा आहेच. त्यातच मग थोडे नाविन्य आणण्याचा मी प्रयत्न केला.’

भातावर 24 कॅरट सोन्याचा वर्ख

हैदराबादमधील या विवाह सोहळ्यात मेजवानीत भातावर सर्व्ह करण्यासाठी 24 कॅरट सोन्याचा वर्ख वापरण्यात आला. पानावर गरमगरम भात वाढला की लगेच हा वर्ख वाढला जात होता. जेणेकरु न सोने चटकन वितळून भातात एकजीव होऊन जाईल आणि सांभार घातल्यावर वर्खाचे तुकडे तोंडात येणार नाहीत. भातावर वाढण्यासाठी वापरलेल्या या सोन्याच्या एका पानाची किंमत होती 300 रूपये. हैदराबादमध्ये ही सोन्याची पानं सहज उपलब्ध आहेत, हे आणखी एक विशेष. शेफ साई असे हटके प्रयोग अनेक विवाह सोहळ्यांमध्ये करीत असतात. पण सोन्याच्या भाताचा हा अनोखा प्रयोग भारतात पहिल्यांदाच झालाय, हे मात्र नक्की.

 

 

Web Title: In Hyderabad shafe gives golden surprise. He served golden rice in wedding ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.