आइस्क्रिम पकोडा, आइस्क्रिम टी ही कॉम्बिनेशन्स आॅड वाटताय का? पण एकदा खाऊन बघाच! हे फ्यूजन फूड खवय्यांना वेड लावतंय !
By admin | Published: May 30, 2017 06:04 PM2017-05-30T18:04:22+5:302017-05-30T18:05:33+5:30
भारतात, महाराष्ट्रात सर्वच हॉटेल्स, रेस्टॉरण्ट्समध्ये मेन्युकार्डवर फ्यूजननं एण्ट्री केली आहे.तुम्हाला आवडेल का हे फ्यूजन फूड ट्राय करायला?
- सारिका पूरकर-गुजराथी
फ्यूजन...एव्हाना हा शब्द सर्वसामान्यांच्या तोंडी चांगलाच रूळलाय. सुगम संगीत, शास्त्रीय संगीत याप्रमाणे संगीतातील फ्यूजन हा प्रकार सर्वांनी अनुभवला आहे. त्यामुळे फ्यूजन हा शब्दही घराघरात पोहोचला आहे. फ्यूजन हा शब्द नसून ती संकल्पना आहे. मिलाफ, मेळ, संयोग अर्थात भिन्न संस्कृती, भिन्न विचार, भिन्न राहणीमान यातील विविध घटकांना एकत्र आणण्याची ही संकल्पना आहे. अलीकडे संगीतच नव्हे तर चित्रकला, शिल्पकला या व इतर कलाप्रकारांमध्ये फ्यूजन ही संकल्पना उचलून धरली जातेय.जग लहान होतोय म्हणतात ना, फ्यूजन संकल्पनेचाही हातभार आहे त्यात. माणसं, संस्कृती जोडण्याचं काम ही संकल्पना करतेय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
फ्यूजनची घौडदोड, तिचा संचार सर्वत्र असा जोरात सुरु असताना फूड इंडस्ट्री मागे कशी राहील. तिनेही फ्यूजन या संकल्पनेला जवळ केलय. भारतात, महाराष्ट्रात सर्वच हॉटेल्स, रेस्टॉरण्ट्समध्ये मेन्युकार्डवर फ्यूजननं एण्ट्री केली आहे. भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीतील पाककृतींना एकत्र सांधण्याचा त्यांचा हा प्रयत्न लोकप्रियही झाला आहे. कारण अनेकांना पाश्चात्य पदार्थांच उदाहरणार्थ जपानचे मोमोज, इटालियन सिझलर्स, मेक्सिकन टॅको आणि अशा बऱ्याच पदार्थांचं आकर्षण तर असतच परंतु कुठेतरी भारतीय पारंपरिक चवीचीही सवय लागलेली असते. म्हणून थेट पाश्चात्य पदार्थांना ट्राय करण्याचं धाडस ते करीत नाहीत. मात्र फ्यूजन फूडमुळे नवनवीन चवी पण तरीही आपला वाटणारा स्वाद अनेकांच्या जिभेवर रेंगाळत आहेत.
तुम्हाला आवडेल का हे फ्यूजन फूड ट्राय करायला? पण त्यासाठी थोडी भटकंती तुम्हाला करावी लागेल. अर्थात नुसती फूडसाठी ती तुम्ही करु नका. पण जेव्हा कधी या शहरांमध्ये जाल तेव्हा नक्की ट्राय करा हे फ्यूजन फूड.
१) मुरक्कू सॅण्डविच
सोप्या भाषेत सांगायचे झालं तर चकली सॅण्डविच. चेन्नईतील सोकार्पेट या मुख्य बाजारपेठेत सॅण्डविचचा सुंदर प्रकार खवय्यांसाठी मिळतो. चेन्नईत स्थायिक झालेल्या मारवाडी बांधवांनी ही संकल्पना बाजारात आणली आहे. दिवाळीच्या दिवसात किंवा एरवी स्नॅक्स म्हणून चकली ( दक्षिण भारतात चकलीला मुरक्कू म्हणतात) घरोघरी तयार होते. त्याच चकलीचा वेगळा वापर सॅण्डविचला क्रंची टेस्ट देण्यासाठी केला जातो. विविध भाज्या, चटण्या आणि मधूनमधून मुरक्कू अशा या फ्यूजन सॅण्डविचला दर्दी खवय्यांनी भरभरुन दाद दिली आहे.
६) आईस्क्रिम चाय
अगदी ऐकूनच भन्नाट वाटलं ना! चहा आणि आइस्क्रिम..काय ग्रेट कॉम्बिनेशन आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मसाला लायब्ररीची ही सिग्नेचर डिश म्हटली तरी चालेल. झोरावर कार्ला यांनी हे अनोखे कॉम्बिनेशन प्रत्यक्षात साकारलंय आणि ते खूप हिट देखील झालंय. आइस्क्रिमवर क्रिमी चहाचा लेयर आणि जोडीला दालचिनी फ्लेवर्सचे कुकीज. मग काय सुटलं ना पाणी तोंडाला!
७) श्रीखंड पॉप्सिकल
गुढीपाडवा, दसऱ्या घराघरात चवीनं खाल्ला जाणारा गोडाचा पदार्थ. घरी तयार केलेले किंवा बाजारातून आकर्षक कंन्टेनरमध्ये आणलेले... श्रीखंडाचं बस्स एवढंच रुपआपण पाहिलं आहे. मात्र बॉम्बे कॅँटीनमध्ये श्रीखंडाला अगदीच नव्या ढंगात सादर केलं जातं. पॉप्सिकलच्या रूपात भरपूर सुकामेवा, चिली क्रम्बलची डिश जोडीला देत श्रीखंड येथे आपल्या पुढ्यात पेश केलं जातं. ही यादी न संपणारी आहे. पान शॉट्स, पिझ्झा ढोकळा, हैदराबादी रिसेटो, फुलका टॅको असे असंख्य फ्यूजन फूडच्या संकल्पना भारतात साकारल्या जात आहेत. एकूण फ्यूजन फूडच्या चाहत्यांसाठी ही मेजवानीच म्हणायची!