वजन कमी करायचंय तर मग हे प्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 07:01 PM2017-09-18T19:01:48+5:302017-09-18T19:15:40+5:30

आहारातलं काहीही कमी जास्त न करताही वजन कमी करणं सहज शक्य आहे. त्यासाठी काही पेयं नक्कीच मदत करू शकतात.

If you want to lose weight then drink it! | वजन कमी करायचंय तर मग हे प्या!

वजन कमी करायचंय तर मग हे प्या!

Next
ठळक मुद्दे* वजन कमी करण्यात पाण्याची भूमिका मोठी असते.* भाज्या उकडून ते पाणी जि-यामि-याची फोडणी देवून, चवीपुरती मीठ घालून सूप म्हणून पिल्यास त्याचा वजन कमी होण्यास चांगला फायदा होतो.* ग्रीन टी हे वजन नियंत्रित करणारं महत्त्वाचं पेय आहे.जर दिवसातून दोन वेळेस ग्रीन टी पिल्यास त्याचा उत्तम फायदा होतो.

- माधुरी पेठकर.



जगातली सर्वात अवघड गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे वजन कमी करणं. वजन कमी करण्यासाठी आहार, व्यायामशैलीत जी नियमितता लागते तीच ठेवणं, नियम पाळणं अवघड असतं. वजन कमी करण्याचा संकल्प जास्तीत जास्त चार दिवस टिकू शकतो. पुढे मग ती आपल्या बस की बात होत नाही. आणि वजन घटवणं हे अपूर्ण स्वप्न आणि अतृप्त इच्छाच राहाते.
वजन कमी करण्यासाठी अमूक खा, एवढंच खा, तमूक अजिबात खाऊ नका असा नियम लावला की तो पाळणं कठीण होतं. व्यायाम तर नकोसाच वाटतो. हे असं असेल तर वजन कमी होणार कसं?
पण आहारातलं काहीही कमी जास्त न करताही वजन कमी करणं सहज शक्य आहे. त्यासाठी काही पेयं नक्कीच मदत करू शकतात.
 

 

1) पाणी

पाणी हे आरोग्यासाठी किती आवश्यक आहे हे वेगळं सांगायला नको. पण वजन कमी करण्यातही पाण्याची भूमिका मोठी असते. योग्य प्रमाणात पाणी पिल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, पचन क्रिया व्यवस्थित काम करते. त्यामुळे वजन कमी करण्याचा उपाय म्हणून पाण्याचाही उपाय करता येतो. व्यायामापूर्वी पाणी पिताना ते कोमट आणि त्यात लिंबू पिळून घेतल्यास व्यायामात अधिक फॅटस कमी होतात.

 

2) भाज्यांचं सूप

भाज्या उकडून ते पाणी जि-यामि-याची फोडणी देवून, चवीपुरती मीठ घालून सूप म्हणून पिल्यास त्याचा वजन कमी होण्यास चांगला फायदा होतो. एकतर या भाज्या उकडलेल्या पाण्यामध्ये खूप पोषणमूल्यं असतात . आणि जेवणाआधी हे सूप घेतल्यानं जेवणं करताना आपोआपच ते मर्यादित प्रमाणात घेतलं जातं.
 

 

3) ग्रीन टी

ग्रीन टी हे वजन नियंत्रित करणारं महत्त्वाचं पेय आहे. हा चहा पिल्यानं शरीरातील साखर नियंत्रित राहाते. जर दिवसातून दोन वेळेस ग्रीन टी पिल्यास त्याचा उत्तम फायदा होतो. ग्रीन टी पिल्यानं केवळ वजनच नियंत्रित राहातं असं नाही तर ग्रीन टीमधले घटक आपल्या शरीराचं वेगवेगळ्या रोगापासून संरक्षण करतं. तसेच आपली रोगप्रतिकाराशक्तीही वाढवते.
 

 

4) भाज्यांचं ज्यूस.

जो फायदा भाज्यांच्या सूपमुळे शरीरास मिळतो तोच फायदा भाज्यांचं ज्यूस प्यायल्यानं मिळतो. त्यामुळे भाज्यांचं सूप हे पावसाळा आणि हिवाळ्याच्या काळात प्यावं तर भाज्यांचं ज्यूस हे उन्हाळ्यात प्यावं. भाज्यांचं ज्यूस घेताना त्यात सोडियमचं प्रमाण जास्त असणार नाही याची काळजी घ्यावी.
 

 

 

5) कोरी कॉफी
अनेकदा पोट बिघडल्यानंतर कोरी कॉफी घेतात. पण हीच कोरी कॉफी वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरते. को-या कॉफीमुळे चयापचय क्रिया सुधारते. को-या कॉफीनं चरबी वेगानं कमी होते. तसेच को-या कॉफीमुळे जास्त उष्मांक जळतात. बैठी जीवनशैली असल्यास वजन नियंत्रित ठेवण्यासाठी कोरी कॉफी ही उत्तमच. पण कोरी कॉफी जर उपाशी पोटी घेतल्यास किंवा दोन पेक्षा जास्त वेळी घेतल्यास त्याचा चयापचयक्रियेवर नकारात्मक परिणाम होवू शकतो.
 

 

 

6) सायविरहित दूध.

सायविरहित दूध प्यायल्यानं शरीरास दूध पिण्याचे जे फायदे मिळायचे असतात ते मिळतात. शरीरास आवश्यक असे प्रोटीन मिळतात. हाड मजबूत करणारी जीवनसत्त्वं मिळतात. शिवाय साय नसल्यानं वजन वाढवणारे उष्मांक मिळत नाही.

 

 

Web Title: If you want to lose weight then drink it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.