चपाती खाऊनसुद्धा वजन होईल कमी, फक्त बनवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 06:05 PM2020-05-08T18:05:37+5:302020-05-08T18:11:42+5:30

सतत चपाती आणि भात खाऊन वजन वाढण्याची शक्यता आहे. आहारात बदल करून तुम्ही वाढतं वजन नियंत्रणात ठेवू शकता. 

Including Chapatti in diet will also help you to lose weight myb | चपाती खाऊनसुद्धा वजन होईल कमी, फक्त बनवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

चपाती खाऊनसुद्धा वजन होईल कमी, फक्त बनवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

googlenewsNext

सध्या लॉकडाऊनमुळे सगळ्यांनाच आरोग्याच्या लहान सहान समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात वजन वाढण्याची समस्या ही कॉमन दिसून येते. शरीराची पुरेशी हालचाल होत नसल्यामुळे फॅट्स वाढत जातात. त्यामुळे हातांचा, कमरेचा, पोटाचा भाग वाढत जाऊन आकार बेढब दिसतो.  लॉकडाऊनमुळे अनेकांचं बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद आहे. घरी जे तयार केलेल्या अन्नाचे सेवन बहुतांश लोक करत आहेत. पण सतत चपाती आणि भात खाऊन वजन वाढण्याची शक्यता आहे. आहारात बदल करून तुम्ही वाढतं वजन नियंत्रणात ठेवू शकता. 

वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात चपातीचा समावेश करू शकता. त्यासाठी कमी कॅलरीजयुक्त चपाती असायला हवी. चपाती कमी कॅलरीजयुक्त कशी करता येईल याबाबत आम्ही सांगणार आहोत. गव्हाच्या एका चपातीमध्ये ५७  कॅलरी असतात. चपातीमधील आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम अनेक आजारांना दूर करण्यात मदत करते. 

चपातीला तेल किंवा तूप लावून खाल्ल्याने यामधील कॅलरी वाढतात होतात. म्हणून शक्यतो तूप किंवा तेल न लावता चपाती खावी. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका नसतो. कारण चपाती शिळी असो किंवा ताजी  शरीरासाठी फायदेशीर ठरते. पण सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे खाद्यपदार्थ लवकर खराब होतात. म्हणून शक्यतो ताज्या चपात्या खाण्याचा प्रयत्न करा. 

ज्या लोकांना डायबिटिसचा त्रास आहे अशा लोकांनी  चपातीचे सेवन केलं तर शरीरासाठी फायदेशीर ठरतं. त्यासाठी सकाळी चपाती दुधात कुस्करून खाल्ल्यास नाष्त्यासाठी एक चांगला ऑप्शन असेल तसंच  यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील. शिवाय कॉलेस्ट्रॉल सुद्धा वाढणार नाही. (हे पण वाचा-तुमच्यामुळे तुमची मुलंही होऊ शकतात थॅलेसेमियाची शिकार; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)

रक्तदाबासंबंधी समस्या असल्यास चपातीच्या सेवनाने कमी होतात. घरच्याघरी तुम्ही व्यायाम करत असाल तर दुधासोबत चपाती खाऊ शकता. अलिकडे कोरोना व्हायरसचा प्रसार होत असताना बाहेरंच खाणं घातक ठरू शकतं म्हणून पोषक घटक शरीराला मिळण्यासाठी चपातीचे सेवन करा. कारण चपातीचे सेवन हे शरीराला त्वरित उर्जा देणारे आहे.

(हे पण वाचा-CoronaVirus News : शारीरिक संबंधांमुळे कोरोना होण्याची भीती; स्पर्म्समध्ये सापडला विषाणू)

Web Title: Including Chapatti in diet will also help you to lose weight myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.