एक कलिंगड की किमत तुम क्या जानो? तब्बल...; जाणून कुठं होतेय 'चौकोनी' कलिंगडाची शेती?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 01:03 PM2022-12-07T13:03:54+5:302022-12-07T13:05:23+5:30

शेतीत नवनवे प्रयोग करण्यात जपान जणू प्रयोगशील शेतीचं केंद्रच बनला आहे. या देशात वेगवेगळ्या पद्धतीनं फळ आणि भाज्या पिकवल्या जातात.

japan square watermelon price in thousand rupees know farming square watermelon cultivation | एक कलिंगड की किमत तुम क्या जानो? तब्बल...; जाणून कुठं होतेय 'चौकोनी' कलिंगडाची शेती?

एक कलिंगड की किमत तुम क्या जानो? तब्बल...; जाणून कुठं होतेय 'चौकोनी' कलिंगडाची शेती?

googlenewsNext

शेतीत नवनवे प्रयोग करण्यात जपान जणू प्रयोगशील शेतीचं केंद्रच बनला आहे. या देशात वेगवेगळ्या पद्धतीनं फळ आणि भाज्या पिकवल्या जातात. याचा बाजारही प्रचंड वाढला आहे आणि मागणीही वाढू लागली आहे. जपानमधील चौकोनी आकाराच्या कलिंगडाची सध्या जोरदार चर्चा आहे. या एका कलिंगडाची किंमत जवळपास १६ हजार रुपयांपासून ते ४१ हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. 

जपान फूड गाइड वेबसाइटच्या माहितीनुसार देशात एका चौकोनी कलिंगडाची किंमत १०० डॉलर म्हणजे ६,५०० रुपयांपासून सुरू होते. तर अशा कलिंगडाची सरासरी किंमत १६ हजार रुपयांच्या जवळपास आहे. ज्यावर्षीय अशा कलिंगडाचं उत्पादन कमी होतं त्यावेळी किमतीतही प्रचंड वाढ होते आणि एका कलिंगडाची किंमत जवळपास ४१ हजार रुपयांपर्यंत पोहोचते. 

कलिंगड चौकोनी आकाराचे का?
चौकोनी आकाराचं कलिंगडाचं उत्पादन घेण्यासाठी नव्या पद्धतीचं बिज किंवा मूळ गुणधर्मात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कलिंगड वेलीवर धरू लागलेला असतो आणि त्याला एका चौकोनी आकाराच्या पारदर्शी बॉक्समध्ये ठेवलं जातं. कलिंगडची पूर्ण वाढ होत असताना चौकोनी आकाराच्या दबावामुळे त्याचा आकारही चौकोनी राहतो. नैसर्गिकरित्या कलिंगड गोल आकाराचा असतो पण चौकोनी बॉक्समध्ये बंदिस्त गेल्यानं फळाच्या आकारात फेरफार केला जातो. 

इकता महाग का?
चौकोनी आकाराचा कलिंगडाची लागवड करणं खूप सोपं काम वाटत असलं तर तसं नाही. एकंदर संपूर्ण प्रक्रियेमध्ये खूप काळजी बाळगावी लागते. आकारात चुकीचा बदल घडणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. तसंच फळाला कोणता रोग पडणार नाही हेही पाहावं लागतं. योग्य परिणाम मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही यादृष्टीनं प्रत्येक फळावर जातीनं लक्ष ठेवावं लागतं. त्यामुळेच यात मेहनत अधिक आहे आणि किंमतही अधिक आहे. 

महाग भाज्या आणि फळांचं केंद्र बनतंय जपान
महागड्या भाज्या आणि फळांचं जपान देश हब बनू लागला आहे. इथं पिकवल्या जाणाऱ्या रुबी रोमन द्राक्षाची किंमत ९ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर युबर टरबूजाची किंमत १५ लाखांपर्यंत पोहोचते. जपानमध्ये महागडी फळं आणि भाज्या गिफ्ट करण्याची फार पूर्वापार परंपरा चालत आली आहे. मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये तसंच सणांमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींना फळं गिफ्ट करण्याची रित या देशात आहे.

Web Title: japan square watermelon price in thousand rupees know farming square watermelon cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.