उन्हाळ्यामध्ये फक्त कूल राहण्यासाठी नाही तर, 'या' फायद्यांसाठी खा आईस्क्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 01:12 PM2019-05-01T13:12:43+5:302019-05-01T13:13:22+5:30

उन्हाळ्यामध्ये थोरामोठ्यांपासून ते अगदी लहानग्यांपर्यंत सर्वांना आईस्क्रीम खायला आवडतं. चवीला टेस्टी आणि अनेक फ्लेवर्स असणारं हे आइसक्रिम आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असतं.

Keep yourself cool and get these benefits by eating ice cream | उन्हाळ्यामध्ये फक्त कूल राहण्यासाठी नाही तर, 'या' फायद्यांसाठी खा आईस्क्रम

उन्हाळ्यामध्ये फक्त कूल राहण्यासाठी नाही तर, 'या' फायद्यांसाठी खा आईस्क्रम

Next

उन्हाळ्यामध्ये थोरामोठ्यांपासून ते अगदी लहानग्यांपर्यंत सर्वांना आईस्क्रीम खायला आवडतं. चवीला टेस्टी आणि अनेक फ्लेवर्स असणारं हे आइसक्रिम आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असतं. यामध्ये दूध, ड्रायफ्रुट्स, चॉकलेट यांसारखे पदार्थ असल्यामुळे आरोग्यासाठी ते अत्यंत फायदेशीर ठरतं. डेयरी प्रोडक्टचा वापर करून तयार केल्यामुळे यामध्ये पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. एवढचं नाही तर आईस्क्रीममध्ये व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन्सही असतात. त्यामुळे ज्यांना आईस्क्रीम खाणं आवडत नसेल त्यांनी आरोग्यासाठी असलेले फायदे जाणून घेऊन आईस्क्रीम खाणं सुरू केलं पाहिजे. जाणून घेऊया काही फायद्यांबाबत...

आईस्क्रीममध्ये अस्तित्वात असलेली तत्व :

कॅल्शिअम

दूध उत्पादनांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कॅल्शिअम असतं. कॅल्शिअमयुक्त पदर्थांचे सेवन केल्याने हाडं मजबुत होण्यास मदत होते. शरीराचं काम सुरळीत होण्यासाठी दररोज कॅल्शिअमची गरज असते. शरीरामध्ये अस्तित्वात असलेले एकूण कॅल्शिअमपैकी 99 टक्के कॅल्शिअम हाडांमध्ये आढळून येतं. डेअरी उत्पादनांच्या सेवनाने शरीराला कॅल्शिअम मुबलक प्रमाणात मिळतं. दररोज आईस्क्रिमसारखे दूधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने ऑस्टियोपोरोसिस यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. कॅल्शिअम फक्त हाडांचे आरोग्य राखण्यासाठी नाही तर वजन कमी करण्यासाठीही मदत करतं. 

प्रोटीन

दूधासारख्या इतर उत्पादनांप्रमाणे आईस्क्रिम प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. प्रोटीन शरीराचे अवयव, हाडं, स्नायू, रक्त आणि त्वचेसाठी फायदेशीर असतं. प्रोटीन खाल्याने स्नायू बळकट होण्यास मदत होते. शरीराचे इतर काही नखं, केस प्रोटीन्सपासूनचं तयार झालेले होते. आईस्क्रिम खाल्याने शरीराला प्रोटीन मिळतं. व्यायाम आणि योगाभ्यास केल्यानंतर आईस्क्रिम खाणं फायदेशीर ठरतं. 

व्हिटॅमिन्स 

आईस्क्रिममध्ये व्हिटॅमिन ए, बी-2 आणि बी-12 आढळून येतं. व्हिटॅमिन ए, त्वचा, हाडं आणि शरीराची रोगप्रतिकार क्षमतेसाठी उत्तम आहे. व्हिटॅमिन ए डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी मदत करतं. व्हिटॅमिन बी-2 आणि बी-12 मेटाबॉलिज्म संतुलित ठेवतं आणि बी-12 वजन कमी करण्यासाठी मदत करतो. जर तुम्हाला फक्त दूध पिणं आवडत नसेल तर आईस्क्रिम खाऊन तुम्ही व्हिटॅमिन्सची कमतरता भरून काढू शकता. 

आईस्क्रिम खाण्याचे काही नुकसानही आहेत : 

आईस्क्रिम खाल्याने आरोग्याला काही नुकसानांचाही सामना करावा लागतो. आईस्क्रिममध्ये साखर असते आणि जास्त प्रमाणात कॅलरी आढळून येतात. याव्यतिरिक्त काही आईस्क्रिम्स तयार करताना त्यामध्ये बटर आणि चॉकलेट असतं. शरीरासाठी ते नुकसानदायी ठरतं. या प्रकारचे आईस्क्रिम खाल्याने डायबिटीज, लठ्ठपणा यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो

जास्त आईस्क्रिम खाल्याने नुकसानदायी ठरू शकतं. खराब क्वालिटीची आइस्क्रिम खाल्याने अनेक आजार होऊ शकतात. याव्यतिरिक्त डोकेदुखी, फूड प्वाइजनिंग यांसारख्या समस्याही होऊ शकतात. त्यामुळे आईस्क्रिम खाण्याआधी तिची क्वॉलिटी पाहूनच खा. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावाही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 
 

Web Title: Keep yourself cool and get these benefits by eating ice cream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.