खव्याचे माझा मोदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 11:02 AM2020-08-12T11:02:46+5:302020-08-17T13:50:45+5:30
यावर्षी मोदकांमध्ये रत्नागिरीतल्या अस्सल हापूस आंब्यांपासून तयार केलेल्या माझाचा वापर करून तुम्ही हापूस आंब्याचे चवीचे मोदक तयार करू शकता.
येत्या काही दिवसांतच घराघरांत आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे. अशातच बाप्पाला नैवेद्यासाठी नवनवीन पदार्थ करण्याची गृहिणींमध्ये चढाओढ असते. बऱ्याचदा नैवेद्यासाठी बाजारातून तयार असलेले पदार्थ आणले जातात. पण तुम्ही वेगळ्या आणि हटके स्टाइलचे चविष्ट मोदक घरच्या घरी तयार करू शकता. तुम्ही खोबरं, खवा आणि रत्नागिरीतल्या अस्सल हापूस आंब्यांपासून बनवलेलं माझा हे पेय वापरून मोदक घरीच झटपट करू शकता. आंबा खाण्याची किंवा आंब्याचे पदार्थ तयार करण्याची इच्छा अनेकांना असते. बाजारात उपलब्ध असलेले पल्प किंवा पावडर आपल्याला हवी तशी नसते.
रत्नागिरीतल्या स्वादिष्ट हापूस आंब्यापासून 'माझा' हे पेय तयार केलं जातं. विशेष म्हणजे हे पेय लोकप्रिय आहे कारण माझा हे स्मूद आणि थिक असल्यामुळे रिअल हापूस आंब्याची टेस्ट सगळ्याचं ऋतूमध्ये अनुभवता येते. यावर्षी मोदकांमध्ये रत्नागिरीतल्या अस्सल हापूस आंब्यांपासून तयार केलेल्या माझाचा वापर करून तुम्ही हापूस आंब्याचे चवीचे मोदक तयार करू शकता. खवा आणि मँगो माझा याचे कॉम्बिनेशन फारचं अफलातून लागतं. त्यामुळे तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करायला हवेत. जाणून घेऊया या कसे तयार करायचे ' माझा खवा मोदक'.
'माझा खवा मोदकसाठी' लागणारं साहित्य:
३५० मिली माझा पेय
खोबरे- एक वाटी
रवा- अर्धी वाटी
खवा- अर्धी वाटी
साखर- १ वाटी,
मैदा
तूप
कृती :
- मैद्यात स्वादिष्ट माझा हे पेय आणि गरजेनुसार पाणी घालून मोदक तयार करण्यासाठी कणीक मळून घ्या.कणकेत माझा घातल्याने छान आंब्याचा फ्लेवर मोदकांना येईल. माझा हे रत्नागिरीच्या हापूस आंब्यापासून तयार झालेलं पेय असल्यामुळे सारणातं किंवा कणकेत घातल्यानंतर एक अनोखी रिच टेस्ट पदार्थाला येते.
- खोबरं खवून घ्या, खवलेलं खोबरं, रवा, खवा, साखर एकत्र करून सारण तयार करा.
- माझा घालून मळलेली कणीक घेऊन त्याच्या पारी तयार करा आणि त्यामध्ये सारण भरून त्याला मोदकाचा आकार द्या.
- तयार मोदक मंद आचेवर तळून घ्या.
- घरच्या घरी स्वादिष्ट आणि जाडसर 'माझा खवा मोदक' तयार असतील, नक्की ट्राय करा. मोदक तळत असताना तुम्ही मँगो माझा पिण्याचा आनंद घेऊ शकता. याशिवाय गणेशोत्सवाच्या काळात इतर गोडधोड पदार्थ तयार करताना अस्स्ल आंब्याचा फ्लेवर येण्यासाठी तुम्ही हापूस आंब्याचा मँगो माझा पदार्थात वापरू शकता. ज्यामुळे पदार्थ अधिकाधिक चविष्ट होईल.
माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अॅमेझॉन इको प्लस (2nd generation).
रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.