आवळ्याचे माहीत असतील आता मोरावळ्याचे हे फायदे जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 01:49 PM2018-12-26T13:49:27+5:302018-12-26T13:53:49+5:30
आवळ्याच्या मुरब्ब्याने हाडे मजबूत होणे, रक्त शुद्ध होणे आणि स्मरणशक्ती वाढणे असे फायदे होतात. यासोबतच आणखीही काही फायदे आवळ्याच्या मुरब्ब्याचे होतात, ते जाणून घेऊन...
आयुर्वेदात आवळ्याला फार आरोग्यदायी आणि पौष्टिक मानलं गेलं आहे. कारण आवळा एक औषधी फळ आहे. याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होता, पण केवळ आवळ्याच्या फळापेक्षाही जास्त फायदे आवळ्याच्या मुरब्ब्याचे म्हणजेच मोरावळ्याचे होतात. मोरावळ्याने हाडे मजबूत होणे, रक्त शुद्ध होणे आणि स्मरणशक्ती वाढणे असे फायदे होतात. यासोबतच आणखीही काही फायदे मोरावळ्याचे होतात, ते जाणून घेऊन...
गर्भावस्था
असे सांगितले जाते की, गर्भवती महिलांनी मोरावळ्याचं सेवन भरपूर प्रमाणात करावं. हे आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं. गर्भवती महिलांनी मोरावळ्याचे नियमीत खाल्ला तर शरीरात हार्मोनल बदलामुळे होणारी केसगळतीची समस्या रोखली जाऊ शकते. तसेच मोरावळ्याने बाळाच्या डोळ्यांची क्षमताही वाढवण्यास मदत करतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. तसेच यात असणाऱ्या अॅंटी-ऑक्सिडेंट गुणामुळे रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते. याने थंडी वाजणे, ताप येणे आणि सतत होणाऱ्या संक्रमणापासून बचाव केला जातो.
मासिक पाळीतील समस्या दूर होतील
महिलांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी आवळ्याचा मुरब्बा फार फायदेशीर ठरतो. ज्यांना फार जास्त वेदना होतात त्यांनी याचं सेवन नियमीत करावं. तसेच मासिक पाळीसंबंधी इतरही समस्यांपासून याने सुटका मिळते.
पिंपल्स आणि डाग दूर होतील
त्वचा चांगली आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या रासायनिक उत्पादनांचा वापर करत असाल. अनेकदा याने काही साइट इफेक्टही होत असतील. अशात नैसर्गिक उपाय म्हणून तुम्ही मोरावळा खाल तर फायदा होऊ शकतो. तुमच्या त्वचेवर येणारे पिंपल्स आणि डाग दूर करण्यास याने मदत मिळते. त्वचेसंबंधी ही समस्या दूर करण्यासाठी हा सर्वात चांगला नैसर्गिक उपाय ठरु शकतो.
रक्ताची कमतरता दूर होते
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आढळतं. यात हीमोग्लोबिन स्तर वाढवण्याची क्षमता असते. ज्या लोकांमध्ये रक्ताची कमतरता असते, त्यांच्यासाठी मोरावळा एका औषधीसारखा काम करतो. मासिक पाळी दरम्यान फार जास्त स्त्राव होत असेल तर मोरावळ्या नक्की खावा.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी
क्रोमियम, झिंक आणि कॉपर हे शरीरासाठी आवश्यक तत्व आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. क्रोमियम खासकरुन रक्तातील कोलेस्ट्रॉल स्तर आणि हृदय रोगांचा धोका कमी करण्यास मदत करतं. तसेच मोरावळ्याने रक्त वाहिन्यांमधील सूज कमी करण्यासही याने मदत होते.