गाजराचे 'हे' आरोग्याला होणारे फायदे वाचाल तर गाजर खातच रहाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 11:20 AM2019-10-01T11:20:42+5:302019-10-01T11:29:59+5:30

गाजराचा सीझन आता सुरू झाला आहे. या दिवसात वेगवेगळ्या फळांचं उत्पादन होतं. त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी या फळांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

Know the health benefits of eating carrot or gajar | गाजराचे 'हे' आरोग्याला होणारे फायदे वाचाल तर गाजर खातच रहाल!

गाजराचे 'हे' आरोग्याला होणारे फायदे वाचाल तर गाजर खातच रहाल!

Next

(Image Credit : rd.com)

गाजराचा सीझन आता सुरू झाला आहे. या दिवसात वेगवेगळ्या फळांचं उत्पादन होतं. त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी या फळांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. या फळांसोबतच गाजर खाण्याचा सल्ला देखील दिला जातो. गाजराचे आरोग्याला वेगवेगळ्या प्रकारे फायदे होतात. खासकरून डोळ्यांसाठी गाजर अधिक फायदेशीर मानलं जातं. गाजरात व्हिटॅमिन ए आणि एल्काइन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे नियमित गाजराचं सेवन करण्याचे फायदे जाणून घेऊ...

१) हिरड्या ठेवा मजबूत

(Image Credit : dentistry.co.uk)

दात स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी गाजर खाणं सुरू करा. गाजर जेव्हा तुम्ही चावता तेव्हा याने दातांच्यामध्ये फसलेला अन्न बाहेर निघतं. तसेच याने लाळेची निर्मितीही होते. गाजर खाल तर दात आणि हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. 

२) डोळे चांगले राहतात

(Image Credit : mirror.co.uk)

डोळ्यांसाठी सर्वात चांगलं व्हिटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन ए मानलं जातं. त्यासोबतच गाजरात बीटा-कॅरोटीन सुद्धा असतं. हे लिव्हरमध्ये जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होतं. हे प्रोटीन सेल्समध्ये मिश्रित होतात आणि डोळ्यांची दृष्टी वाढवतात. त्यामुळे गाजराच्या सेवनाने रात आंधळेपणापासूनही बचाव होतो.

३) रंग उजळवण्यासाठी

(Image Credit : visine.com.au)

गाजर त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानलं जातं. गाजरामध्ये असलेले मिनरल्स तत्व अनेक प्रकारच्या रोगांपासून बचाव करण्यासोबतच शारीरिक आणि त्वचेची सुंदरता वाढवतात. यात असलेल्या एल्केलाइन गुणांमुळे रक्त शुद्ध होतं.  त्यामुळे तुम्हाला त्वचेसंबंधी समस्यांपासूनही सुटका मिळते.

४) वाढत्या वयाचा प्रभाव कमी होतो

(Image Credit : spice4life.co.za)

कमी वयातच अनेकदा महिलांच्या त्वचेवर वृद्धपणाची लक्षणे दिसू लागतात. यासोबतच सुरकुत्याही वाढू लागतात. जर तुम्हाला या समस्या असतील तर तुम्ही गाजर खायला पाहिजे. गाजर तुम्ही तसंही खाऊ शकता किंवा ज्यूसही घेऊ शकता. याने वाढत्या वयाच्या खूणा त्वचेवरून दूर होण्यास मदत मिळेल. तसेच गाजराचा ज्यूस प्यायल्याने शरीरात रक्त वाढतं. 

Web Title: Know the health benefits of eating carrot or gajar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.