शिमला मिरचीचा हलवा एकदा खाल खातच रहाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 05:26 PM2018-12-31T17:26:41+5:302018-12-31T17:29:10+5:30
आपण आतापर्यंत अनेक प्रकारचे हलवा तुम्ही चाखला असेलच. त्यामध्ये प्रामुख्याने गाजराच्या आणि दुधीच्या हलव्याचा समावेश होतो.
आपण आतापर्यंत अनेक प्रकारचे हलवा तुम्ही चाखला असेलच. त्यामध्ये प्रामुख्याने गाजराच्या आणि दुधीच्या हलव्याचा समावेश होतो. परंतु तुम्ही कधी शिमला मिरचीचा हलवा ट्राय केला आहे का? भारतातील रांची शहरामध्ये हा हलवा तयार करण्यात येतो. ऐकून थोडं विचित्र वाटलं असेल पण चवीला हा पदार्थ फार चांगला लागतो. जाणून घेऊया हटके रेसिपी...
साहित्य :
- 1 शिमला मिरची
- 1 चमचा तूप
- 2 कप दूध
- 4 ते 5 वेलची
- 8 ते 10 मनुके
- 6 ते 7 बदाम
- 3 ते 4 अक्रोड
- साखर
कृती :
- सर्वप्रथम शिमला मिरचीच्या बिया काढून बारिक कापून घ्या.
- आता पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
- शिमला मिरचीचा कडवटपणा घालवण्यासाठी 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून व्यवस्थित पाणी काढून घ्या.
- एक पॅन गरम करून त्यामध्ये तूप टाकून वेलची आणि मनुके परतून घ्या.
- त्यानंतर कापलेली शिमला मिरची टाकून 3 ते 4 मिनिटांपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर साखर एकत्र करून 2 मिनिटांपर्यंत शिजवून घ्या.
- थोड्या वेळाने त्यामध्ये दूध एकत्र करून पुन्हा मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.
- मिश्रण शिजल्यानंतर वेलची पावडर टाकून मध्येम आचेवर थोडा वेळ शिजवा.
- गरम गरम हलवा ड्राय फ्रुट्स घालून सर्व्ह करा शिमला मिरचीचा गोड गोड हलवा.