शिळा भात खाल्ल्याने होते 'ही' गंभीर समस्या; असा करा बचाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 03:26 PM2019-02-12T15:26:54+5:302019-02-12T15:31:42+5:30
आपण अनेकदा जेवणानंतर उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवतो आणि परत गरम करून खातो. परंतु यामध्ये अनेकदा आपण ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की, नुकसानदायी आहे याकडे दुर्लक्षं करतो.
आपण अनेकदा जेवणानंतर उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवतो आणि परत गरम करून खातो. परंतु यामध्ये अनेकदा आपण ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की, नुकसानदायी आहे याकडे दुर्लक्षं करतो. तुम्हाला माहीत आहे का? जेवणामध्ये उरलेला शिळा भात खाल्याने शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण जर तुम्ही या भाताचा वापर करताना थोडी काळजी घेतली तर या समस्यांपासून सुटका करून घेणं सहज शक्य होतं.
इंग्लंडमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, पुन्हा गरम केलेला भात खाल्याने फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो. परंतु ही समस्या शिळा भात पुन्हा गरम केल्याने नाही तर भात शिजवल्यानंतर तो कशा पद्धतीने ठेवतो त्यावर अवलंबून असतं.
तांदळामध्ये असतात बॅक्टेरिया
हेल्थकेअर सिस्टमनुसार, न शिजवलेल्या तांदळामध्ये बॅसिलस सिरस (Bacillus Cereus) नावाचं बॅक्टेरियाचे स्पोर्स म्हणजेच जीवाणू असतात. ज्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं. हे बॅक्टेरिया अत्यंत घातक असतात की, तांदूळ शिजवल्यानंतरही जीवंत राहू शकतात किंवा वाढूही शकतात.
तांदूळ शिजवल्यानंतर जेव्हा खूप वेळासाठी ते साधारण तापमानामध्ये ठेवण्यात येतात. तेव्हा हे जीवाणू बॅक्टेरियाचं रूप घेतात. हे बॅक्टेरिया वेगाने वाढतात आणि टॉक्सिन्स वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतात. परिणामी फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो. यासाठी अत्यंत आवश्यक आहे की, तांदूळ शिजवल्यानंतर जास्त वेळासाठी साधारण तापमानामध्ये ठेवू नका.
जेवणानंतर उरलेला भात स्टोअर करण्याची पद्धत
जर रात्रीच्या जेवणानंतर भात शिल्लक राहिला तर तो दुसऱ्या दिवसासाठी व्यवस्थित झाकून ठेवा. आम्ही तुम्हाला भात झाकून ठेवण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. या पद्धतीने उरलेला भात झाकून ठेवला तर तो खराबही होणार नाही आणि आरोग्यासाठी घातकही ठरणार नाही.
नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS)च्या रिपोर्टनुसार, तांदूळ शिजवल्यानंतर लगेच खाण्यासाठी द्या आणि जर तो शिल्लक राहिला तर थंड होइपर्यंत एक तासाच्या आतमध्येच व्यवस्थित झाकून ठेवा. तुम्ही शिल्लक राहिलेला भात फ्रिजमध्येही ठेवू शकता. परंतु फ्रिजमध्ये ठेवत असाल तर फक्त एक दिवसासाठी ठेवून गर करून खा. एका दिवसापेक्षा जास्त वेळा फ्रिजमध्ये ठेवू नका. एका दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवलेला भात खाल्याने आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.