Whiskey on The Rocks : व्हिस्कीमध्ये खूप बर्फ टाकण्याला का म्हणतात ‘ऑन द रॉक्स’? जाणून घ्या यामागची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 07:41 PM2023-02-15T19:41:37+5:302023-02-15T19:42:55+5:30

‘ऑन द रॉक्स’ म्हणजेच भरपूर बर्फासह व्हिस्की दिली जाणं. आधुनिक काळात व्हिस्कीमध्ये बर्फ टाकण्याची ही प्रथा अमेरिकन मानली जाते.

lifestyle food Why is putting ice in whiskey called on the rocks Know the story behind it American started this | Whiskey on The Rocks : व्हिस्कीमध्ये खूप बर्फ टाकण्याला का म्हणतात ‘ऑन द रॉक्स’? जाणून घ्या यामागची कहाणी

Whiskey on The Rocks : व्हिस्कीमध्ये खूप बर्फ टाकण्याला का म्हणतात ‘ऑन द रॉक्स’? जाणून घ्या यामागची कहाणी

googlenewsNext

व्हिस्की घेताना त्यात बर्फ टाकायचा का नाही हा आजही त्याचं सेवन करणाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय असतो. याबाबतीला एक ‘ओल्ड स्कूल’ गट असं करणं म्हणजे काहीतरी गुन्हा केल्यासारखाच मानतो. आपल्यापर्यंत पोहोचत असलेल्या एका महागड्या सिंगल मॉल्ड व्हिस्कीमध्ये बर्फ टाकून त्याचं नैसर्गिक रुप आणि सुगंध नष्ट करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. व्हिस्कीच्या नैसर्गिक चवीचा आनंद घेण्यासाठी ती ‘नीट’ पिणंच उत्तम असल्याचं वाईन एक्स्पर्ट्सचं म्हणणं आहे.

सामान्य लोक पाणी अथवा बर्फाशिवाय व्हिस्कीची कल्पनाही करू शकत नाहीत. परंतु व्हिस्कीमध्ये बर्फ टाकावा का नाही? हा प्रश्न उरतोच. जर बर्फ टाकणे हा काही जाणकरांच्या दृष्टीने इतका गंभीर विषय आहे, तर 'ऑन द रॉक्स' सारखा शब्द मद्यपान करणाऱ्यांच्या शब्दकोषाचा भाग का बनला? चला समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

काय आहे अर्थ आणि इतिहास?
ऑन द रॉक्स म्हणजे भरपूर बर्फासह व्हिस्की दिली जाणं. यात ग्लास अर्धा बर्फाने भरला जातो आणि त्यावर व्हिस्की टाकली जाते. काही लोक याच्या उलटही करतात. पण ती योग्य पद्धत नाही. परंतु बर्फासाठी रॉक या शब्दाचा वापर का? यामागे एक गोष्ट आहे. इंटरनेटवर असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा झाला तर ९ ते ११ व्या शतकात अस्तित्वात असलेले वायकिंग योद्धा आपल्या मद्यातील कडवटपणा दूर करण्यासाठी आणि थंड ठेवण्यासाठी त्यात नदीतील दगड टाकत होते. 

तर नंतर स्कॉटलंडमध्ये शेतकऱ्यांमुळे स्कॉन ऑन द रॉक्सची सुरुवात झाली. फ्रीज आणि आईस क्युब यांच्या पूर्वी स्कॉटीश लोक आपली व्हिस्की थंड ठेवण्यासाऑठी नदी किंवा तलावांमध्ये असलेल्या थंड दगडांचा वापर करत असत. अधिक पाणी मिळसणं त्याचा फ्लेवर खराब करू शकत होता, यामुळे त्याला थंड करण्यासाठी दगड हा उत्तम पर्याय होता.

हळहळू जगभरात प्रसार
जगाला स्कॉचसारखं मद्य देणाऱ्या देशात व्हिस्की प्रामुख्यानं दोन प्रकारे दिली जाते. एक म्हणजे ‘नीट’ आणि दुसरा प्रकार म्हणजे एक थेंब पाण्यासह. एक थेंब पाणी व्हिस्कीचे फ्लेवर प्रोफाईल ओपन करण्यास मदत करते असं स्कॉटीश लोकांचं म्हणणं आहे. आजही ते ज्या पाण्यानं व्हिस्की तयार करतात त्याला वेगळं पॅक करून विकतात. हे पाणी व्हिस्कीच्या फ्लेवरचा आनंद घेण्यास मदत करत असल्याचं म्हटलं जातं. आधुनिक काळात आता व्हिस्कीत बर्फ टाकण्याचा प्रकार हा अमेरिकन मानला जातो.

१९४० मध्ये आईस क्युब ट्रे चा शोध लागला आणि त्यातून निघणारा बर्फ आकर्षित करत होता. अनेकांना तो छोट्या दगडांसारखा म्हणजेच रॉक सारखा वाटत होता. अमेरिकन आपल्या ड्रिंकमध्ये सेल्झर वॉटर आमि बर्फ मिसळून डायल्यूट करायचे आणि त्या ‘द हायबॉल’ असं म्हणायचे. त्यानंतर काही कंपन्यांनी बर्फासोबतच म्हणजे ऑन द रॉक्स ला प्रमोट केलं आणि नंतर याचा जगभरात प्रसार झाला.

बर्फाचा विरोध का?
यात बर्फाचा विरोध करणारे वाईन एक्सपर्ट दोन मुख्य कारणं सांगतात. पहिलं कारण म्हणजे जेव्हा बर्फ व्हिस्कीत टाकला जातो त्यानंतर तो विरघळतो आणि त्याला डायल्यूट करतो. यामुळे त्यात पाण्याचं प्रमाण वाढतं आणि व्हिस्कीचा फ्लेवर कमी होतो. दुसरं कारण म्हणजे बर्फ टाकल्यानंतर मद्याचं तापमान तेजीनं खाली येतो. त्यामुळे आपल्याला टेस्ट बड्सना त्याची चव नीट समजत नाही. पण आता बर्फ टाकावा का नाही प्रश्न थोटा जटीलच आहे. हा ज्याच्या त्याच्या अनुभवावर आधारित असेल. 

(टीप - या लेखात फूड आणि वाईन तज्ज्ञांच्या हवाल्यानं ही माहिती देण्यात आली आहे. त्याचा उद्देश कोणत्याही प्रकारे मद्यपानाला प्रोत्साहन देणे नाही.)

Web Title: lifestyle food Why is putting ice in whiskey called on the rocks Know the story behind it American started this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.