'लो ब्लड प्रेशर डाएट'ने ब्लड प्रेशर ठेवा नियंत्रणात!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 01:13 PM2019-02-01T13:13:23+5:302019-02-01T13:14:33+5:30

हायपरटेंशन असो किंवा हाय ब्लड प्रेशर, नाहीतर डायबिटीज हे सर्व आजार आहाराकडे केलेलं दुर्लक्षं आणि अनियमित जीवनशैलीमुळे जडलेले असतात. जर याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर याच्या गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो.

Low blood pressure diet for control high blood pressure | 'लो ब्लड प्रेशर डाएट'ने ब्लड प्रेशर ठेवा नियंत्रणात!

'लो ब्लड प्रेशर डाएट'ने ब्लड प्रेशर ठेवा नियंत्रणात!

Next

हायपरटेंशन असो किंवा हाय ब्लड प्रेशर, नाहीतर डायबिटीज हे सर्व आजार आहाराकडे केलेलं दुर्लक्षं आणि अनियमित जीवनशैलीमुळे जडलेले असतात. जर याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर याच्या गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो. स्ट्रोक, हार्ट अटॅक, किडनी फेल, लिव्हर फेल यांसारखे अनेक आजार हाय ब्लड प्रेशरमुळेच होतात. हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी आपल्या लाइफ स्टाइलमध्ये काही बदल करणं गरजेचे असतात. त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्येही काही बदल करणं फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया अशा काही पदार्थांबाबत ज्यांचा आहारामध्ये समावेश केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. 

जाणून घेऊया ब्लड प्रेशर डाएट नक्की आहे तरी काय? ज्याचा आहारात समावेश केल्याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते. 

केळी

पिकलेल्या केळ्यांमध्ये पोटॅशिअम तत्व असतं. हे ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. त्यामुळे नियमितपणे केळ्यांचा समावेश आपल्या डाएटमध्ये केल्याने हाय ब्लड प्रेशरवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होते. 

धान्य

धान्य आणि कडधान्य आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मैदा किंवा रिफाइंड केलेल्या पीठापेक्षा चक्कीमध्ये दळलेलं पीठ, ओट्स आणि दुसऱ्या धान्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. तसेच याशिवाय अनेक उपयोगी तत्वही आढळून येतात. अशा पदार्थांचा आहारात समावेश केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्न, फोलेट अॅसिड, मॅग्नेशिअम यांसारखी आवश्यक तत्व असतात. यामध्य फायबरही मुबलक प्रमाणात असतं. फळभाज्यांमध्ये फायबर असतं, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. 

फॅट नसलेलं दूध

फॅट नसलेलं दूध आणि इतर डेअरी प्रोडक्ट्सच्या पदार्थांचं सेवन केल्याने शरीराला कॅल्शिअम मिळतंच परंतु, यामुळे हृदयासंबंधि अनेक समस्या उद्भवतात. 

डार्क चॉकलेट 

डार्क चॉकलेट मध्ये फ्लेवोनॉयड्स नावाचे तत्व असते, जे हाय ब्लडप्रेशर कंट्रोल करण्यासाठी मदत करतं. परंतु चॉकलेट्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे थोड्या प्रमाणात चॉकलेटचे सेवन करणं फायदेशीर ठरतं.

लसूण

लसूण ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतं. यामध्ये असलेली पोषक तत्व आणि एलिसिन आपल्या शरीरामध्ये असलेली नुकसानदायी कोलेस्ट्रॉल किंवा एलडीएल कमी करण्यासाठी मदत करतं. दररोज रिकाम्या पोटी पाण्यासोबत लसणाच्या दोन पाकळ्या खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 

Web Title: Low blood pressure diet for control high blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.