उकडीचे माझा मोदक : सेलिब्रिटी शेफ निलेश लिमये यांची स्वादिष्ट मोदकांची रेसिपी; बाप्पासह घरची मंडळीही होईल खूष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 06:46 PM2020-08-23T18:46:32+5:302020-08-25T00:16:13+5:30
यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलो आहोत.
गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाला मोदकांचा नैवद्य दाखवण्यात येतो. घराघरांमध्ये मोदक तयार केले जातात. गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलो आहोत.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. याआधी लोकप्रिय शेफ भारती म्हात्रे आणि मधुरा बाचल यांनी प्रेक्षकांना चवदार-चविष्ट मोदक करून दाखवले आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही सेलिब्रिटी शेफ निलेश लिमये यांनी दाखवलेली स्वादिष्ट आणि चवदार उकडीच्या माझा मोदकांची रेसिपी पाहू शकता.
निलेश लिमये व्यवसायाने शेफ असून त्यांनी अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत. रेस्टॉरंट सल्लागार आणि विविध मासिकांमध्येही लेखन केले आहे. 'सिंदबाद द शेफ' या टोपणनावाने ते प्रसिद्ध आहेत. चवदार चविष्ट जेवणापासून ते मोठ्या प्रमाणात बुफेपर्यंत विविध स्वयंपाकघर सेटअपमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. निलेश लिमये हे आपल्या पदार्थांमुळे प्रचंड लोकप्रिय आहेत. निलेश लिमये यांनी केलेल्या स्वादिष्ट मोदक रेसिपी पाहण्यासाठी https://www.youtube.com/Lokmat, https://www.youtube.com/user/Indiafoodnetworkआणि Lokmat.com/MaazaModak या वेबसाईटला भेट द्या.
माझा उकडीचे मोदक
साहित्य :
वाढण्या करिता:
300ml माझा मँगो
५० ग्राम साजूक तूप
उकडीसाठी :
1 वाटी तांदूळ पिठी
१ वाटी पाणी
मीठ आणि १ टीस्पून तूप
सारणासाठी:
१ वाटी नारळाची चव
१/२ वाटी गुळ
२ टीस्पून वेलची पूड
कृती:
सर्व प्रथम एका भांड्यात १ वाटी पाणी उकळायला ठेवा. त्यात थोडं मीठ आणि तूप घाला आणि पाणी उकळला कि त्यात तांदुळाची पिठी घाला. मिश्रण एकजीव करून घ्या आणि उकड भांड्या ला सुटून येस तोवर शिजवा. मग झाकण ठेवून मंद आचेवर २-३ मिनिटं वाफवून घ्या. उकड एका बाउल मध्ये काढून घ्या आणि गरम असताना मळून घ्या.
एका पॅन मध्ये नारळाची चव, किसलेला गुळ आणि वेलची पूड एकत्र करून गुळ वितळस्तोवर गरम करा आणि सारण एकजीव करा.
आता उकडीचे छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे गोळे करा.. त्याची पातळ पारी करा आणि मोदकाच्या पाकळ्या द्या.. त्यात सारण भरून मोदक बनवा. साधारण ११ मोदक तयार होतील.. सगळे मोदक चाळणी अथवा मोदक पात्रात १० मिनिटे वाफवा. चाळणीला ahi थोडं तेल kinda तूप लावा.
सर्विंग साठी :
गरम गरम मोदक वाढण्या अगोदर एका पॅन मध्ये तूप गरम करा आणि त्यात माझा घाला. तूप आणि माझा च कॉम्बिनेशन खूप मस्त गोड़ लागेल. हे माझा तूप मोदकांवरती वाढा.
आंब्याच्या स्वादाचा तुपात भिजलेले हे मोडकांवर ताव मारा
माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अॅमेझॉन इको प्लस (2nd generation).
रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.