काजूचे माझा मोदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 04:55 PM2020-08-21T16:55:05+5:302020-08-21T17:03:56+5:30
रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या भन्नाट मोदकांची रेसेपी सांगणार आहोत.
गणपती उत्सवानिमित्त घरी जमलेल्या सर्वच बायका या कामात आनंदानं सहभागी होतात आणि घरातली तरुण मंडळीही मदतीच्या निमित्तानं या आनंद सोहळ्यात सहभागी होतात. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वचजण सण उत्सावाच्यावेळी आपला जास्तीत जास्त वेळ घरच्यांसोबत असतील. जर तुम्ही यानिमित्ताने काही वेगळं करायच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या भन्नाट मोदकांची रेसेपी सांगणार आहोत.
गणपतीला मोदक अतिशय प्रिय. त्यामुळे गणेशोत्सवात ते आवर्जून केले जातातच. त्यात उकडीचे मोदक म्हणजे तर पर्वणीच. मोदक करणं हा घरातल्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. गणपतीच्या पहिल्या दिवशी तर उकड काढून मोदक वळायला बसणं हा कार्यक्रम घरोघरी होतो. अस्सल हापूस आंब्याच्या माझाचा वापर करून तुम्ही अप्रतिम चवीचे काजूचे माझा मोदक बाप्पासाठी तयार करू शकता. काजू आणि माझा यांचे कॉम्बिनेशन असेल तर अफलातून मोदक तयार होतील. चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करायचे माझा काजू मोदक.
माझा काजू मोदकासाठी लागणारं साहित्य
350 मीली माझा पेय
१ कप काजु पावडर
१/४ कप मिल्क पावडर
१/४ कप पिठीसाखर
१ टी स्पुन तूप
१/४ कप दुध
१/४ कप वेलची पावडर
५-६ केसर
कृती:
येथे दिलेल्या सर्व पावडर आणि पीठीसाखर एका बाउल मध्ये घेऊन व्यवस्थित मिक्स करा. या मिश्रणाला एका कढई मध्ये मध्यम आचेवर शिजवा. शिजवताना मिश्रणाला सारखे हलवत राहा. दुध घातल्यानंतर या मिश्रणात रुम टेंमरेचरवर असेलेले माझा पेय अर्धा पेला घाला. गरजेनुसार तुम्ही वाढवू शकता.
हे मिश्रण शिजताना घट्ट होत जाते. हे मिश्रण कढईला चिपकने बंद होईपर्यंत शिजवा. या प्रक्रियेला साधारणतः ४-५ मिनिटे लागतात. माझा अस्सल हापूस आंब्यांपासून तयार केल्यामुळे मिश्रणात चांगले एकजीव होते. छान थिक आणि स्मूथ टेश्चर पदार्थाला येते.
आता या मिश्रणाला थोडेसे थंड होऊ द्या, जेणेकरून त्यापासून मोदक बनवता येतील. मिश्रण पूर्णतः थंड झाल्यास कठीण/कडक होईल.
हातांना थोडे से तुप लावुन या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवा, त्यानंतर त्यांचे मोदक तयार करा आणि त्यांना थंड होऊ द्या. इथे मोदक साच्याच्या मदतीने बनवले गेले आहेत. साच्याला मधुन थोडेसे तुप लावा आणि त्यात एक गोळ्याला भरा. साच्याला बंद करून थोडेसे दाबा.
आता मोदक हलक्या हाताने साच्यामधुन बाहेर काढा आणि थंड होण्यासाठी ठेवा. छान पिवळा रंग या मोदकांना आला असेल. तयार आहेत आपले रिच टेस्ट माझा काजू मोदक. मोदकांशिवाय इतर गोड पदार्थांमध्ये रत्नागिरीच्या हापूस आंब्याची अप्रतिम चव येण्यासाठी तुम्ही माझा वापरू शकता.
माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अॅमेझॉन इको प्लस (2nd generation).
रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.