चॉकलेटचे माझा मोदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 07:22 PM2020-08-23T19:22:01+5:302020-08-23T19:36:57+5:30

चॉकलेट आणि हापूस आंब्याचे कॉम्बिनेशन मोदकांमध्ये अप्रतिम चव देईल . 

Maaza Modak Recipe ; Choclate maaza modak | चॉकलेटचे माझा मोदक

चॉकलेटचे माझा मोदक

Next

गणेशोत्सव म्हटलं की मोदक आलेचं. मोदकांचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. चॉकलेट म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्याच आवडीचा पदार्थ.  यंदा बाप्पासाठीही तुम्ही रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या फ्लेवरचे चॉकलेटचे मोदक तयार करू शकता. हे मोदक कंडेन्स मिल्क आणि कोको पावडरपासून तयार करण्यात येतात. चॉकलेट आणि हापूस आंब्याचे कॉम्बिनेशन मोदकांमध्ये अप्रतिम चव देईल . 

बाहेरून आणलेले मोदक मनासारखे नसतात किंवा पैसै देऊनही समाधानकारक पदार्थ मिळत नाही. पण घरच्याघरी कमी खर्चात तुम्ही हे मोदक तयार करून बाप्पाला हटके आणि आगळा वेगळा नैवेद्य  दाखवू शकता. माझाच्या थिक आणि स्मुद टेक्स्चरमुळे मोदक अप्रतिम लागतात. चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करायचे  चॉकलेटचे माझा  मोदक.

चॉकलेटचे माझा  मोदकासाठी लागणारं साहित्यं

३५० मीली मँगो माझा पेय

१/४ कप खवा

१/४ कप + २ टेस्पून पिठी साखर (पिठी साखर चाळून मगच वापरावी.)

दीड ते २ टेस्पून कोको पावडर

कृती

खवा ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावा. बाहेर काढून ढवळावे. ढवळताना खव्यात अर्धा पेला मँगो माझा घालावा. आणि परत १५ सेकंद मायक्रोवेव्ह करावे. छान पिवळसर रंग खव्याला येतो. ते मिश्रणातील ओलावा कमी होईपर्यंत ढवळा. माझा हे रत्नागिरीच्या अस्सल हापूस आंब्यांपासून तयार केलेलं असल्यामुळे खव्यात सहज एकत्र होतं. माझा घाल्याने मस्त रिच टेस्ट मोदकांना येईल. 

पुन्हा ढवळून २० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. जोवर खवा हलकासा ब्राउन होत नाही तोवर २०-२० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. (एकूण साधारण दीड मिनिट लागेल.) खवा २ मिनिटे व्यवस्थित ढवळावा. थोडे निवळले कि पिठी साखर घालून मिक्स करावे. एका वेळी १ टीस्पून कोको पावडर घालावी. मिक्स करावे. आता अजून एक टीस्पून पावडर घालावी. जोवर मिश्रण थोडे घट्टसर होत नाही तोवरच कोको पावडर घालावी.  मिश्रण घट्ट झाले की  मोदकाच्या साच्यात मिश्रण घालून मोदक करावेत. तयार आहेत  चॉकलेटचे माझा  मोदक. मोदकांशिवाय इतर गोड पदार्थांमध्ये रत्नागिरीच्या हापूस आंब्याची अप्रतिम चव येण्यासाठी तुम्ही माझा वापरू शकता.

माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अ‍ॅमेझॉन इको प्लस (2nd generation).

 रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.

Web Title: Maaza Modak Recipe ; Choclate maaza modak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.