चॉकलेट माझा मोदक : लोकप्रिय फूड ब्लॉगर सोनाली राऊत यांची चविष्ट 'चॉकलेट माझा मोदकांची' रेसिपी, नक्की ट्राय करा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 07:23 PM2020-08-25T19:23:30+5:302020-08-25T19:35:02+5:30
'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. माझा मोदक रेसिपी शो हा घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहे.
गणपतीच्या पहिल्या दिवशी तर उकड काढून मोदक वळायला बसणं हा कार्यक्रम घरोघरी होतो. यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलोय. 'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. माझा मोदक रेसिपी शो हा घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहे.
महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये या कार्यक्रमात मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. प्रसिद्ध शेफनी या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रेक्षकांना चवदार-चविष्ट मोदक करून दाखवले आहेत.
आता फूड ब्लॉगर म्हणून लोकप्रिय असलेल्या सोनाली राऊत सहभागी झाल्या आहेत. सोनाली राऊत यांचा 'नमकशमक डॉट कॉम' नावाचा (Namakshamak.com) एक फूड ब्लॉग आहे. रुचकर मेजवानी या यूट्यूब चॅनेलवर होस्ट म्हणूनही काम केलं आहे. यासोबत त्यांचे स्वत:चे 'कूक विथ सोनाली' (Cook with Sonali Raut) असं हिंदी यूट्यूब चॅनल आणि बहिणीसोबत नमकशमक (Namakshamak) नावाचं इंग्रजी यूट्यूब चॅनल आहे. जिथे त्या नेहमी नवनवीन रेसिपी घेऊन येत असतात. आज त्यांनी प्रेक्षकांना चॉकलेट माझा मोदक दाखवले आहेत. मग पाहा हा चविष्ट चवदार मोदकांचा व्हिडीओ.
चॉकलेट माझा मोदक
साहित्य:
१ कप डार्क चॉकलेट
१ टेबलस्पून दूध पावडर
३ टेबलस्पून किसलेले खोबरे
१ कप माझा ड्रिंक
कृती:
मोदकाचे सारण बनविण्यासाठी:
गॅसच्या मंद आचेवर पॅन गरम करा.
१ कप माझा ड्रिंक पॅनवर ओतून घ्या.
१० मिनीट माझा ड्रिंकचे प्रमाण अर्धे होईपर्यंत गॅसवर गरम करा.
त्यात ३ टेबलस्पून किसलेले खोबरे आणि २ टेबलस्पून दूध पावडर घाला.
मिश्रणाचा मऊ गोळा होईपर्यंत ते ढवळत राहा.
मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या.
मोदक बनविण्यासाठी:
डार्क चॉकलेट १ मिनीट मायक्रोवेव्हमध्ये वितळवून घ्या.
(चॉकलेट वितळवण्यासाठी तुम्ही डबल बॉयलरचा देखील वापर करू शकता)
साधारण रूमच्या तापमानावर येईपर्यंत चॉकलेट ढवळत राहा.
सिलिकॉन मोदक साच्यात वितळलेले चॉकलेट भरून घ्या.
साचा हळूच दाबून घ्या.
अधिकचे चॉकलेट सुरीच्या साहाय्याने काढून टाका.
साचा फ्रीजमध्ये पाच मिनिटांसाठी ठेऊन द्या.
उरलेले चॉकलेट भांड्यात ओतून घ्या.
साच्यातील प्रत्येक मोदकामध्ये माझाचे सारण भरून घ्या.
भांड्यातील चॉकलेट वापरून मोदक बंद करून घ्या.
माझाचे सारण मोदकामध्ये समप्रमाणात पसरावे यासाठी हळूच दाबा.
पुन्हा रेफ्रिजरेटरमध्ये १० मि. थंड होण्यासाठी ठेऊन द्या.
साच्यातून मोदक हळूच बाहेर काढून घ्या.
आपले चॉकलेट माझा मोदक आहेत तयार!
सोनाली राऊत यांनी केलेल्या स्वादिष्ट 'चॉकलेट माझा मोदक' ची रेसिपी पाहण्यासाठी https://www.youtube.com/Lokmat, https://www.youtube.com/user/Indiafoodnetworkआणि Lokmat.com/MaazaModak या वेबसाईटला भेट द्या.
माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अॅमेझॉन इको प्लस (2nd generation).
रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.