ड्रायफ्रूट माझा मोदक : लोकप्रिय शेफ अनिता केदार यांची 'ड्रायफ्रूट्स माझा मोदकांची रेसिपी; चविष्ट नैवेद्य नक्की ट्राय करा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 06:59 PM2020-08-26T18:59:02+5:302020-08-29T23:41:32+5:30
यंदा गणेशोत्सवासाठी सुपर शेफ अनिता केदार यांनी ड्रायफ्रूट्स मोदक केले आहेत. या मोदकांची खासियत म्हणजे हे मोदक करताना त्यामध्ये रसाळ, गोड आंब्यांनी तयार केलेला माझा वापरण्यात आलं आहे.
'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये या कार्यक्रमात मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे.
यंदा गणेशोत्सवासाठी सुपर शेफ अनिता केदार यांनी ड्रायफ्रूट्स मोदक केले आहेत. या मोदकांची खासियत म्हणजे हे मोदक करताना त्यामध्ये रसाळ, गोड आंब्यांनी तयार केलेला माझा वापरण्यात आलं आहे. मावा आणि ड्रायफ्रूटस घातलेल्या या 'ड्रायफ्रूट्स माझा मोदक' मध्ये आंब्याची गोडी प्रेक्षकांना चाखता येईल. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही साध्य होतं. एका सर्वसामान्य गृहिणीने हे सिद्ध करून दाखवलं आहे.
अनिता केदार या आपल्या पाक कौशल्याने लोकप्रिय शेफ झाल्या आहेत. अनिता केदार दिसायला आकर्षक आणि चवीला सुंदर खाद्यपदार्थ अत्यंत सोप्या पद्धतीने त्या प्रेक्षकांना करून दाखवतात. अनिता आपल्या हटके अंदाजाची फोडणी देऊन प्रत्येक पदार्थ चविष्ट करतात. मग पाहा हा अनिता केदार यांनी केलेल्या चविष्ट ड्रायफ्रूट्स माझा मोदकांचा व्हिडीओ.
ड्रायफ्रूट् माझा मोदक
साहित्य:
मोदक आवरणासाठी –
१ कप दूध पावडर
१ कप सुके खोबरे
१/४ कप कंडेंस्ड मिल्क
१/४ कप माझा मॅंगो ड्रिंक
सारणासाठी –
१/४ कप काजूचे तुकडे
१/४ कप बदाम
३ टेबलस्पून पिस्ता
१/४ कप माझा मॅंगो ड्रिंक
२ टेबलस्पून पिठीसाखर
१/४ चमचा जायफळ पावडर
कृती –
एका पॅनमध्ये माझा घेऊन ते थोडे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.
आता ते बाजूला काढून त्याच पॅनमध्ये पांव चमचा तूप घालून सुकामेवा टाकावा.
सुकामेवा १ मि. माध्यम आचेवर परतून घ्या.
आता त्यात साखर आणि घट्ट माझा घाला आणि गोळा बनवून घ्या.
वरील गोळा थंड होण्यासाठी बाजूला ठेऊन द्या.
आता दूध पावडर, सुके खोबरे मिक्स करून त्यात माझा घालून घट्ट गोळा बनवून घ्या.
आता लहान गोळा घेऊन हाताने पुरी करून मोदकाच्या साच्यात ठेवा.
त्यात अर्धा चमचा सुकामेव्याचे सारण भरून मोदक बनवून घ्या.
तयार आहेत आपले चविष्ट ड्रायफ्रूट मावा माझा मोदक!
अनिता केदार याचं एक यूट्यूब चॅनल देखील आहे. 'अनिता केदार रेसिपी' (AnitaKedar's Recipes) या चॅनलवर त्या प्रेक्षकांसाठी नेहमीच चटकदार, चविष्ट पदार्थांची मेजवानी घेऊन येत असतात. त्यांच्या चॅनलचे ४१५K सबस्क्रायबर्स असून https://www.youtube.com/c/AnitaKedarsRecipes या ठिकाणी त्यांच्या रेसिपी पाहता येतील.
लोकप्रिय शेफ अनिता केदार यांनी केलेल्या स्वादिष्ट 'ड्रायफ्रूट्स माझा मोदक' ची रेसिपी पाहण्यासाठी https://www.youtube.com/Lokmat, https://www.youtube.com/c/AnitaKedarsRecipes आणि Lokmat.com/MaazaModak या वेबसाईटला भेट द्या.
माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अॅमेझॉन इको प्लस (2nd generation).
रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.