हलबाई माझा मोदक : चवदार-चविष्ट मोदकांची 'मधुराज् रेसिपी' नक्की ट्राय करून पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 04:18 PM2020-08-21T16:18:52+5:302020-08-25T00:22:53+5:30
हलबाई माझा मोदक चविष्ट आणि चवदार कसे तयार करायचे यासासाठी पाहा हा व्हिडीओ.
गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. दरवर्षी भाद्रपद चतुर्थी ते चतुर्दशी या काळात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गणेशोत्सवातील आनंद वाढवण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत माझा मोदक रेसिपी शो. या कार्यक्रमात गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सुपर शेफ मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवतील. आजपासून तुम्हाला रोज ११ वाजता Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो पाहता येईल.
आपल्या चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या रेसिपींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुपर शेफ मधुरा बाचल यांचा सहभाग या उपक्रमात आहे. मधुरा जगातील ख्यातनाम शेफ असून त्या अनेक भारतीय पदार्थांच्या स्वादिष्ट रेसिपी शेअर करत असतात. अमेरिका, कॅनडा आणि अनेक देशांमध्येही त्या लोकप्रिय आहेत. मधुरा बाचल यांची युट्यूबवर अनेक रेसिपी चॅनल्स आहेत. या चॅनेल्सच्या सबस्क्रायबर्सची संख्यादेखील मोठी आहे. अतिशय सहज पद्धतीनं आणि सोप्या शब्दांमध्ये रेसिपी सांगण्याचं आणि ती करून दाखवण्याचं कौशल्य मधुरा यांच्याकडे आहे. हलबाई माझा मोदक चविष्ट आणि चवदार कसे तयार करायचे यासासाठी पाहा हा व्हिडीओ.
साहित्य:
१/२ कप तांदूळ
१/२ कप ओले खोबरे
माझा ड्रिंक
गूळ
कृती:
तांदूळ २ तास भिजत ठेवा.
भिजवलेले तांदूळ व ओले खोबरे यात १ १/४ कप माझा मिसळून मिक्सरला वाटून घ्या
पॅनवर बाटलीतील माझा ओतून त्यात १ १/४ कप गूळ घाला व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या
हे मिश्रण मऊ कणकेच्या गोळ्यासारखे होईपर्यंत शिजवून घ्या
त्यात २ टीस्पून तूप घालत मिश्रण पुन्हा ढवळून घ्या.
वरील सर्व मिश्रण मोदक साच्यात भरून मध्यभागी बदामाचे तुकडे घाला व साचा बंद करा.
झाले हलबाई माझा मोदक तयार!
मधुरा यांची चविष्ट मोदक रेसिपी पाहण्यासाठी https://www.youtube.com/Lokmat, https://www.youtube.com/MadhurasRecipeMarathiआणि Lokmat.com/MaazaModak ला भेट द्या.
माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अॅमेझॉन इको प्लस (2nd generation).
रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.