मोतीचुराचे माझा मोदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 06:42 PM2020-08-22T18:42:28+5:302020-08-24T22:47:34+5:30
माझा हे रत्नागिरीच्या हापूस आंब्यापासून तयार करण्यात आलेलं पेय आहे. खास मोदकांमध्ये मँगो माझाचा वापर करून तुम्ही आंब्याच्या फ्लेवरचे मोदक तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करायचे मोतीचूर माझा मोदक.
प्रतिष्ठापनेनंतर बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. अनेकदा हे मोदक बाजारातून विकत आणले जातात. पण फेस्टिव्हल सिझनमध्ये बाजारात मिळणाऱ्या मिठाईमध्ये भेसळ आढळून येते. या भेसळयुक्त पदार्थांपासून दूर राहण्यासाठी विघ्नहर्त्याला घरीच आपल्या हाताने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणं कधीही उत्तमच.
गणरायाच्या नैवेद्यासाठी घराघरात उकडीच्या मोदकांचा घाट घातला जातो. अनेकदा व्यवस्थित मोदकांचा बेत फसतो. यापेक्षा घरच्याघरी उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून तुम्ही अप्रतिम मोदक तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला खास रत्नागिरीच्या हापूस आंब्याची माझा मोतीचूर रेसेपी सांगणार आहोत. ही रेसेपी अगदी कमीत कमी साहित्यात तुम्हाला झटपट बनवता येईल. माझा हे रत्नागिरीच्या हापूस आंब्यापासून तयार करण्यात आलेलं पेय आहे. खास मोदकांमध्ये मँगो माझाचा वापर करून तुम्ही आंब्याच्या फ्लेवरचे मोदक तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करायचे मोतीचुराचे माझा मोदक.
साहित्य
350 मिली माझा पेय ,
बेसन एक वाटी, साखर 1.5 वाटी,
तेल एक चमचा,
वेलची पूड 1/2 चमचा,
पिस्त्याचे तुकडे 1 चमचा आणि केशराच्या काड्या, तळण्यासाठी तूप किंवा तेल.
कृती
बेसन एका मोठ्या वाडग्यात घेऊन त्यात अर्धा पेला माझा हे पेय घाला. त्याचं पातळ मिश्रण करून घ्या पण यात गुठळ्या राहता कामा नये. त्यात एक चमचा तेल घाला आणि चांगलं फेटून घ्या. जोपर्यंत त्याला थोडा फेस येत नाही. माझा रत्नागिरीच्या अस्सल हापूस आंब्यांपासून तयार केलेले पेय असल्यामुळे चण्याच्या पिठात सहज एकत्र होते. अप्रतिम हापूस आंब्याचा फ्लेवर माझामुळे या पिठाला येतो.
एका पॅनमध्ये तूप घालून ते मध्यम आचेवर ठेवा. आता यावर झारा धरून बेसनाची बुंदी पाडून घ्या. ही बुंदी किमान 5 मिनिटं तळा. मग टिश्यू पेपरवर काढून निथळून घ्या. म्हणजे त्यातील एक्सट्रा तूप किंवा तेल शोषलं जाईल. बुंदी तळून होते तोपर्यंत तुम्ही माझा एन्जॉय करू शकता.
आता दुसऱ्या पॅनमध्ये साखरेचा पाक बनवून घ्या. एक तारी पाक तयार झाल्यावर त्यात वेलची पूड आणि पिस्त्याचे तुकडे घाला. या पाकात बुंदी घालून चांगलं मिक्स करा आणि 15 मिनिटं तसंच ठेवा. आता हे बुंदी मिक्स्चर साच्यात घालून मोदकाचा आकार द्या. जर तुमच्याकडे मोदकाचा साचा नसेल तर हातानेच मोदकाचा आकार द्या. तयार आहेत हापूस आंब्याचे रिच टेस्ट मोतीचूर माझा मोदक.
माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अॅमेझॉन इको प्लस (2nd generation).
रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.