पुरणाचे माझा मोदक: लोकप्रिय शेफ योगिता बिले यांची 'पुरणाचे माझा मोदक' रेसिपी; एकदा खाल खात रहाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 05:45 PM2020-08-28T17:45:17+5:302020-08-28T17:52:56+5:30
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत.
गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलो आहोत. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत.
२१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. माझा मोदक रेसिपी शो हा घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहे. योगिता बिले आपल्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांमुळे प्रसिद्ध आहेत. देशाच्या विविध भागातील अनेक पारंपरिक पदार्थ आजच्या नवीन पिढीला माहीत नाहीत. ते लोप पावत आहेत. हे पदार्थ सर्वांना माहीत व्हावेत यासाठी योगिता यांनी स्वत:च एक युट्यूब चॅनल सुरू केलं आहे.
योगिता बिले यांचं योगिताज किचन (Yogita's Kitchen) या नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे. २०१७ मध्ये त्यांनी याला सुरुवात केली असून स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे २७० हून अधिक व्हिडीओ प्रसारीत झालेले आहेत. योगिता बिले यांचं सासर आणि माहेर दोन्ही तळकोकणातील कुडाळ येथील असल्याने कोकणच्या संस्कृतीमध्ये पाककृती तयार करण्याचे धडे लहानपणापासून त्यांनी घेतले आहेत. त्यांचे वडील हॉटेल व्यावसायिक तर विवाहानंतर पतीची अनेक ठिकाणी बदली झाल्याने विविध प्रांतातील पाककृती शिकण्याची संधी त्यांना मिळाली. आपल्या खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या योगिता बिले यांनी प्रेक्षकांना आज खास 'पुरणाचे माझा मोदक' करून दाखवले आहेत. मग पाहा पुरणाच्या माझा मोदकांचा व्हिडीओ.
माझा पुरणाचा मोदक
साहित्य:
सारणासाठी:
१/२ कप माझा
१/२ कप किसलेले खोबरे
१ कप चणाडाळ
१ कप गुळ
१ चिमूट मीठ
१/४ टीस्पून जायफळ पूड
तळणीसाठी तेल
१ चमचा तूप
पिठासाठी:
१ कप गव्हाचे पीठ
१/४ कप तांदळाचे पीठ लाटण्यासाठी
१/४ टीस्पून मीठ
१ टीस्पून तूप
१/२ कप माझा
कृती:
१. चणाडाळ स्वच्छ धुवून ४ वाट्या पाणी घालून कुकरमध्ये ३ शिट्ट्या काढून शिजवून घ्यावी.
२. एका पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करावे. त्यात किसलेले खोबरे घालून परतून घ्यावे.
३. माझा घालून मिश्रण गोळा होईपर्यंत शिजवून घ्यावे.
४. कुकर थंड झाल्यावर शिजलेली डाळ लगेचच चाळणीवर ओतावी व त्यातील पूर्ण पाणी काढावे.
५. दुसऱ्या पॅनमध्ये पाणी निथळलेली डाळ घ्यावी. त्यात गुळ, मीठ घालून पुरण शिजवून घ्यावे.
६. मिश्रण थोडे सुकत आल्यावर त्यात वरील माझाचे सारण, वेलची, जायफळ पूड घालून पुरण पूर्ण सुकवून घ्यावे.
७. पुरण थंड करत ठेवावे.
८. गव्हाच्या पीठात एक चमचा तांदळाचे पीठ व मीठ मिक्स करावे.
९. तूप चांगले गरम करावे व पिठात घालावे.
१०. हे तुपाचे मोहन पीठात छान हाताने चोळून एकजीव करावे.
११. आता माझाने वरील पीठ छान मळून घ्यावे. गरजेप्रमाणे माझा वापरणे.
१२. माझा वापरल्याने पीठाला छान माझाची चव येते.
१३. हे मळलेले पीठ एक तासासाठी झाकून ठेवावे.
१४. १ तासानंतर पीठ पुन्हा छान मळून घ्यावे व त्याचे एकसारखे गोळे करावेत.
१५. पोळीप्रमाणे लाटून छोट्या लाट्या करून घ्याव्यात.
१६. थंड झालेलं पुरण प्रत्येक लाटीत मधोमध घालून त्याच्या छान कळ्या पाडाव्यात.
१७. गॅसवर मध्यम आचेवर तेल गरम करावे व सर्व मोदक छान दोन्ही बाजूंनी तळून घ्यावेत.
१८. माझा मुलांना फारच आवडते. पीठात व सारणात माझा वापरल्याने छान आपल्या मोदकांना आंब्याची चव येते. पारंपारिक रेसिपीला नवलाईची जोड मिळते!
योगिता बिले यांची 'पुरणाचे माझा मोदक' ची रेसिपी पाहण्यासाठी https://www.youtube.com/Lokmat, https://yogitaskitchen.com/ आणि Lokmat.com/MaazaModakया वेबसाईटला भेट द्या.
माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अॅमेझॉन इको प्लस (2nd generation).
रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.