रवा माझा मोदक : प्रसिद्ध शेफ भारती म्हात्रे यांची 'रवा माझा मोदक' रेसिपी; नक्की ट्राय करून पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 06:34 PM2020-08-27T18:34:55+5:302020-08-27T18:36:13+5:30
आपल्या विविध चविष्ट खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या शेफ भारती म्हात्रे यांनी आज रवा माझा मोदक दाखवले आहेत.
गणेशोत्सव महाराष्ट्राचा सण आहे आणि 'माझा' महाराष्ट्रामधल्या रत्नागिरीतल्या अस्सल हापूस आंब्यांपासून तयार केला जातो. हापूस आंब्यांपासून तयार करण्यात आलेल्या माझाचा वापर करून आपण चवदार चविष्ट मोदक तयार करू शकतो. अस्सल हापूस आंब्यांपासून तयार करण्यात आल्यानं माझा कोणत्याही पिठासोबत सहज एकजीव होतो. आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलो आहोत. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे.
आपल्या विविध चविष्ट खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या शेफ भारती म्हात्रे यांनी आज रवा माझा मोदक दाखवले आहेत. भारती म्हात्रे यांना स्वादिष्ट पदार्थ करण्याची प्रचंड आवड होती. त्यांनी आपली हिच आवड लक्षात घेऊन ती व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतला. एक गृहिणी ते सुपर शेफ असा जबरदस्त प्रवास त्यांनी केला आहे. भारती म्हात्रे यांचं 'सिंपली स्वादिष्ट' (Simply Swadisht) नावाचं एक युट्यूबवर चॅनल आहे. या चॅनेल्सच्या सबस्क्रायबर्सची संख्यादेखील मोठी आहे. त्यावर त्या नेहमीच नवनवीन पदार्थांची मेजवानी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. मग पाहा भारती म्हात्रे यांचा चविष्ट रवा माझा मोदकांचा व्हिडीओ.
माझा रवा मोदक -
साहित्य:
शिरा बनविण्यासाठी:
२५० ग्रॅम रवा
५०० मिली माझा
१ कप काजू पावडर
वेलची/जायफळ पावडर
२ टेबलस्पून तूप
१ कप साखर
काजू
मोदकाच्या आवरणासाठी-
३ ते ४ कप गव्हाचे पीठ
१/४ टीस्पून मीठ
तेल
तळण्यासाठी तूप
कृती:
२ टेबलस्पून तूपात काही मिनीटांसाठी रवा भाजून घ्या.
त्यात माझा ड्रिंक ओता व संपूर्ण शोषून घेईपर्यंत शिजवत राहा.
वरील मिश्रणात साखर, वेलची/जायफळ पावडर आणि काजू घालून मिक्स करा.
पिठाच्या गोळ्यासाठी-
पिठात मीठ आणि माझा मिक्स करून घ्या.
दोन टेबलस्पून तेल घालून मऊ गोळा होईपर्यंत पीठ मळून घ्या.
पिठापासून लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घ्या.
गोळा पोळपाटावर लाटून पुऱ्या बनवून घ्या.
पुरीमध्ये रव्याचे सारण भरा व त्याला मोदकाचा आकार द्यावा.
सोनेरी रंग येईपर्यंत तूपात मोदक तळून घ्या.
तुमचे माझा रवा मोदक आहेत तयार!
भारती म्हात्रे यांची चविष्ट मोदक रेसिपी पाहण्यासाठी https://www.youtube.com/Lokmat, https://www.youtube.com/SimplySwadisht_BharatiMhatre/आणि Lokmat.com/MaazaModak या वेबसाईटला भेट द्या.
माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अॅमेझॉन इको प्लस (2nd generation).
रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.