तीळगुळाचे माझा मोदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 04:10 PM2020-08-18T16:10:55+5:302020-08-19T18:59:13+5:30

रत्नागिरीतल्या हापूस आंब्यांपासून तयार केलेलं माझा हे पेय अनेकांच्या आवडीचं शीतपेय आहे. माझा पिताना जो काही स्वाद जिभेवर रेंगाळतो, तो अविस्मरणीय असतो.

Maaza Modak Recipe : Tilgul Maaza Modak | तीळगुळाचे माझा मोदक

तीळगुळाचे माझा मोदक

googlenewsNext

गणपती बाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. गणपतीच्या सणात बाप्पासाठी केलेले मोदक पाहिल्यानंतर आपल्या तोंडाला पाणी सुटते. बाप्पाला दररोज नवनवीन पदार्थांचे नैवेद्य दाखविण्यात येते. बऱ्याचदा बाप्पाला आवडणाऱ्या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य प्रसाद म्हणून ठेवला जातो. पण तुम्ही बाप्पाच्या नैवेद्यासाठी काही हटके पदार्थांचा विचार करत असाल तर माझा पेयापासून खास मोदक तयार करू शकता.

बऱ्याच लोकांना आंबे खाण्याची आवड असते, पण ठरावीक मोसमात आंबे येत असतात, आंबे सगळ्याच ऋतूत उपलब्ध होत नसतात. मे महिना सोडल्यास बाजारात आंबे उपलब्ध होत नाहीत. अशा मोसमात बऱ्याचदा माझा शीतपेय अनेक जण चवीनं पितात, रत्नागिरीतल्या हापूस आंब्यांपासून तयार केलेलं माझा हे पेय अनेकांच्या आवडीचं पेय आहे. माझा पिताना जो काही स्वाद जिभेवर रेंगाळतो, तो अविस्मरणीय असतो. विशेष म्हणजे गणेशोत्सवात तुम्ही माझापासून बनवलेल्या स्पेशल आंब्याच्या चवीच्या मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवू शकता. त्यामुळे माझाची रिच  टेस्ट मोदकांना येईल. 

उकडीचे मोदक, काजू मोदक हे नेहमीच घरोघरी तयार केले जातात. पण कोणतंही जास्तीचं साहित्य न वापरता आरोग्यदायी तीळ, गूळ आणि माझा या पेयाचा वापर करून चविष्ट मोदक तयार केले जाऊ शकतात आणि गणपतीसाठी प्रसादाच्या स्वरूपात हे आंब्याचे मोदक म्हणून नैवेद्य दाखवता येऊ शकतात. माझा हे आंब्यापासून तयार केलेलं शीतपेय आहे. कोणत्याही ऋतूत एखाद्या पदार्थाला आंब्याची चव देण्यासाठी माझा शीतपेयाचा वापर केला जातो. चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करायचे हापूस आंब्याच्या चवीने परिपूर्ण असे 'माझा तीळगूळ मोदक'. 

'माझा तीळगूळ मोदकासाठी लागणारं साहित्य'

३५० मिली माझा पेय

गूळ-  एक वाटी

तीळ- एक वाटी

कणीक- दोन वाट्या

तूप 

माझा तीळगूळ मोदकासाठी कृती : 

- सर्वात आधी कणीक मळून घ्या. कणीक मळताना माझा पेय गरजेनुसार कणकेत घालून मळा. हापूस आंब्याचे माझा पेय  घातल्यानं कणकेला छान मऊपणा आणि पिवळरस रंग येईल. 

- एका कढईमध्ये तीळ भाजून घ्या. जोपर्यंत तीळ भाजून होतात तोपर्यंत तुम्ही अस्सल आंब्याचे माझा पिऊन इन्जॉय करू शकता. 

- गुळाचा पाक तयार करून त्यात भाजलेले तीळ एकत्र करा.

- हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. 

- माझा पेयानं मळलेल्या कणकेचा गोळा घेऊन त्याची पारी तयार करून त्यामध्ये सारण भरावे. 

- त्याला मोदकाप्रमाणे आकार देऊन मोदक तळून घ्या. 

- तीळ व गुळाचे तयार केलेले सारण थोडं गरम असतानाच मोदकाच्या साच्यामध्ये भरून त्याला   मोदकाचा आकार द्या. 

- बाप्पाला नैवेद्य दाखविण्यासाठी 'माझा तीळगुळाचे  मोदक' तयार आहेत. मोदकच नाही तर  गणेशोत्सवात तुम्ही इतर कोणताही पदार्थ तयार  करताना अस्सल आंब्यापासून तयार करण्यात आलेल्या थिक आणि स्मूद माझा या हापूस आंब्याच्या रसाचा वापरू शकता.

माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अ‍ॅमेझॉन इको प्लस (2nd generation).

 रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.

Web Title: Maaza Modak Recipe : Tilgul Maaza Modak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.