उकडीचे माझा मोदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 04:00 PM2020-08-22T16:00:21+5:302020-08-22T16:20:46+5:30

आम्ही तुमच्याशी 'माझा मोदक' या उपक्रमाअंतर्गत एक नवीन मोदकांची रेसिपी शेअर करणार आहोत.

Maaza modak recipe : Ukdiche maaza modak | उकडीचे माझा मोदक

उकडीचे माझा मोदक

Next

गणेशोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महिलांची लगबग सुरू झाली आहे. यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जास्त झगमगाट नसला तरी घराच्या घरी मात्र उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यात आधी डोक्यात येतं, ते म्हणजे बाप्पाच्या आणि तुम्हा-आम्हा सगळ्यांच्या आवडीचे मोदक. घरोघरच्या गृहिणी नावीन्यपूर्ण मोदक आणि मेजवानी कशी करता येईल या विचारात असतात. म्हणूनच आम्ही तुमच्याशी 'माझा मोदक' या उपक्रमाअंतर्गत एक नवीन मोदकांची रेसिपी शेअर करणार आहोत.

रत्नागिरीतल्या हापूस आंब्यापासून बनवलेलं माझा हे पेय वापरून तुम्ही उत्कृष्ट चवीचे मोदक घरच्या घरी तयार करू शकता. आंब्यापासून तयार केलेलं माझा हे पेय बऱ्याच जणांना आवडतं. सगळ्याच ऋतूमध्ये अस्सल. उन्हाळ्यात आंब्याचा मोसम येतो तेव्हाच वेगवेगळ्या आंब्याच्या रेसिपीज बनवल्या जातात. पण आता येत्या गणेशोत्सवात रत्नागिरीतल्या हापूस आंब्यापासून तयार केलेल्या माझा या पेयाचा वापर करून तुम्ही अप्रतिम चवीचे मोदक बनवू शकता. साधे उकडीचे मोदक बनवण्यापेक्षा तुम्ही यात माझा वापराल तर छान आंब्याचा फ्लेवर मोदकांना येऊन रिच टेस्ट येईल. चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करायचे 'उकडीचे माझा मोदक'.

'उकडीच्या माझा मोदकां'साठी लागणारं साहित्य:

३५० मिली माझा पेय

तांदळाची पिठी- ४ वाट्या

पाणी- ३ वाट्या

तेल- १ पळी

साजूक तूप- १ लहान चमचा

मीठ- चवीपुरते

ओलं खोबरं- १ वाटी

चिरलेला गूळ- पाऊण वाटी

उकडीचे 'माझा मोदक' तयार करण्याची कृती :

- एका भांड्यामध्ये तूप घ्या.

- त्यामध्ये खवलेलं खोबरं आणि गूळ एकत्र करून शिजवून घ्या. शिजवताना त्यात माझा पेयाचं अर्धा पेला मिश्रण करा. आवश्यकतेनुसार अजून घालू शकता. माझा घातल्यानं अस्सल चवीचा आणि नैसर्गिक आंब्याचा फ्लेवर सारणाला येईल .

- प्रथम एका भांड्यात पाणी उकळत ठेवा.

- थोडं गरम झाल्यावर त्यात मीठ आणि तेल टाका.

- पाणी चांगले उकळले गेले की त्यात तांदळाची पिठी घाला.

- सर्व मिश्रण नीट एकत्र करून एक वाफ काढा, मग त्यात साजूक तूप घालून पुन्हा एक वाफ द्या.

- थंड झाले की ताटात काढून उकड मळून घ्या. मळताना माझा शीतपेय घाला. लक्षात ठेवा पिठात माझा घालताना ते रूम टेम्परेचरवर असावे. कणकेत मँगो माझा घातल्यानं  सॉफ्ट आणि आंब्याचा नॅचरल टेक्सचर  या कणकेला येईल. माझा हे रत्नागिरीच्या  हापूस आंब्याचं पेय असल्यामुळे कणकेत मिसळल्यानंतर सहज एकजीव होतं.

- उकडीचा एक लहान गोळा करून तो तांदळाच्या पिठीमध्ये घोळवून घ्या.

- उकडीला खोलगट वाटीचा आकार द्या.

- त्यामध्ये खोबरं गूळ आणि माझाचं शिजवलेलं सारण भरा.

- त्यानंतर वाटीला एक एक करून पाकळ्या काढा. पाकळ्या जितक्या जवळ आणि सारख्या अंतरावर असतील तेवढा मोदक आकर्षक दिसेल.

- त्यानंतर तळव्यावर ठेवून बोटांच्या साहाय्याने पाकळ्या बंद करून वरच्या बाजूला टोक ठेवा.

- रेखीव आणि मुलायम उकडीचे चविष्ट आणि जाडसर 'माझा मोदक' बाप्पासाठी तयार आहेत. उकडीचे माझा मोदक तुपासोबत खाताना अप्रतिम हापूस आंब्याची रिच टेस्ट त्यात उतरेल. बाप्पालासह खाणारेही म्हणतील लाजवाब माझा मोदक.

माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अ‍ॅमेझॉन इको प्लस (2nd generation).

 रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.

Web Title: Maaza modak recipe : Ukdiche maaza modak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.