Maaza Modak: सेलिब्रिटी शेफ निलेश लिमये शिकवणार 'मलई माझा मोदक'; पाहा थोड्याच वेळात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 02:25 PM2020-08-29T14:25:25+5:302020-08-29T14:34:28+5:30

गणेशोत्सवानिमित्त माझा आणि लोकमतची माझा मोदक स्पर्धा

maaza modak watch chef nilesh limaye mangolicious modak recipe | Maaza Modak: सेलिब्रिटी शेफ निलेश लिमये शिकवणार 'मलई माझा मोदक'; पाहा थोड्याच वेळात

Maaza Modak: सेलिब्रिटी शेफ निलेश लिमये शिकवणार 'मलई माझा मोदक'; पाहा थोड्याच वेळात

googlenewsNext

आपल्या चटकदार, चविष्ट खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेले सेलिब्रिटी शेफ निलेश लिमये आज आपल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यंदाचा गणेशोत्सव खास होण्यासाठी निलेश प्रेक्षकांना 'मलई माझा मोदक' ची रेसिपी दाखवणार आहेत. 

यंदा उत्सावावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे यंदा घरच्या घरीच बाप्पाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सर्वांच्या लाडक्या बाप्पाला मोदक फार आवडतात. अशातच बाप्पा घरी आले की त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी घराघरांमध्ये मोदक केले जातात. गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलोय. 

महाराष्ट्रातील सुपर शेफ या कार्यक्रमात गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत. निलेश लिमये व्यवसायाने शेफ असून त्यांनी अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत. रेस्टॉरंट सल्लागार आणि विविध मासिकांमध्येही लेखन केले आहे. 'सिंदबाद द शेफ' या टोपणनावाने ते प्रसिद्ध आहेत. चवदार चविष्ट जेवणापासून ते मोठ्या प्रमाणात बुफेपर्यंत विविध स्वयंपाकघर सेटअपमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. 

निलेश लिमये हे आपल्या पदार्थांमुळे प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांनी याआधीही आपल्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. निलेश उकडीचे मोदक विथ माझा प्रेक्षकांना करून दाखवले आहेत. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. माझा मोदक रेसिपी शो हा घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहे. यामध्ये आज पुन्हा एकदा शेफ निलेश लिमये 'मलई माझा मोदक' करून दाखवणार आहेत. ही रेसिपी नेमकी कशी असणार याबाबत लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. 

निलेश लिमये यांनी केलेल्या स्वादिष्ट मोदक रेसिपी पाहण्यासाठी दुपारी ४ वाजता https://www.youtube.com/Lokmathttps://www.youtube.com/user/Indiafoodnetworkआणि Lokmat.com/MaazaModak या वेबसाईटला भेट द्या.

माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अ‍ॅमेझॉन इको प्लस (2nd generation).

 रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.

Web Title: maaza modak watch chef nilesh limaye mangolicious modak recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.