Makar Sankranti 2023: यंदा मकर संक्रांतीला गुळपोळीबरोबर करा चटपटीत, रसरशीत आणि पौष्टिक उंधियु!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 11:46 AM2023-01-14T11:46:08+5:302023-01-14T11:46:33+5:30

Makar Sankranti 2023: सण समारंभाबरोबर खाद्यसंस्कृतीची देवाण घेवाण ओघाने आलीच, संक्रांतीनिमित्त शिकून घ्या शेजारच्या राज्यातील उंधियुची पाककृती!

Makar Sankranti 2023: Celebrate Makar Sankranti this year with Gulpoli along with tangy, juicy and nutritious udhiyu! | Makar Sankranti 2023: यंदा मकर संक्रांतीला गुळपोळीबरोबर करा चटपटीत, रसरशीत आणि पौष्टिक उंधियु!

Makar Sankranti 2023: यंदा मकर संक्रांतीला गुळपोळीबरोबर करा चटपटीत, रसरशीत आणि पौष्टिक उंधियु!

googlenewsNext

मकर संक्रांतीनिमित्त महाराष्ट्रात बोरन्हाण, हलव्याचे दागिने, हळद कुंकू समारंभ, नववधू तसेच जावयासाठी हलव्याचे दागिने आणि तिळगुळ वाटपाला महत्त्व असते, तसे गुजरातमध्ये संक्रांतीला पतंग महोत्सवाला बहर येतो. घराघरातील आबालवृद्ध मंडळी इमारतीच्या छतावर गोळा होतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पतंग चढवण्याची स्पर्धा सुरू असते. या दिवशी तिळाची चिक्की, जिलेबी, फाफडे आणि जोडीला उंधियु असाच मुख्य बेत असतो. यात उंधियु बनवणे हे थोडे वेळकाढू काम असल्याने घरातल्या गृहिणी आदल्या दिवशी भाज्या आणून उंधियु बनवून ठेवतात. रात्रभर ती भाजी मुरल्याने दुसऱ्या दिवशी तिची चव आणखीनच लज्जतदार लागते. आपण मराठी घरात गुळपोळी करतोच, त्याला यंदा जोड देऊया उंधियु पुरीची! त्यासाठी जाणून घ्या सविस्तर पाककृती. 

साहित्य –२ वाटी मेथीच्या मुठिया , अर्धी वाटी चिंचेचा कोळ , २ मोठे चमचे गुळ , १ छोटी वाटी बारीक चिरलेली लसून पात १ छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.

उंधियोसाठी भाज्या: ४ लहान वांगी (जांभळी) , १ छोटा जांभळा कंद स्वच्छ धुवून, साल काढून, मोठ्या मोठ्या चौकोनी फोडी करून , ८-९ लहान बटाटे स्वच्छ धुवून , २ कच्ची केळी साले काढून मोठ्या गोल आकारात कापून , १ वाटी सोललेले हिरवे वाटणे पाऊण वाटी सोललेले हिरवे तुरीचे दाणे  पाव वाटी सोललेले हिरवे हरभरे , १.५ वाटी सोललेली सुरती पापडी .

फोडणीसाठी: ३ मोठे चमचे तेल , चिमूटभर हिंग , अर्धा छोटा चमचा जीरे , अर्धा छोटा चमचा ओवा , पाव चमचा हळद मसाला वाटण , १ मोठी जुडी कोथिंबीर , मुठभर हिरवी कोथिंबीर , ३/४ कप ताजा खोवलेला नारळ , ४-५ मोठ्या तिखट हिरव्या मिरच्या , अर्धी वाटी भाजलेले सोललेले शेंगदाणे , पाव वाटी पांढरे तीळ , १ मोठा चमचा ओवा , चवीपुरते मिठ.

कृती -: मसाला वाटणासाठी वर दिलेले साहित्य खडबडीत वाटून घ्यावे. कुकरमध्ये तेल गरम करून वर दिलेले फोडणीचे साहित्य घालावे. जीरे तडतडले की त्यात सुरती पापडी घालून दोन मिनटे परतावी. आता त्यात वाटलेला हिरवा मसाला घालून, थोडे मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतावा. आता राहिलेल्या सगळ्या उन्धीयोच्या भाज्या घालून मासाल्यासोबत ढवळाव्यात. अर्धा कप पाणी घालून कुकरचे झाकण लावावे. १० मिनटे मध्यम आचेवर आणि ५ मिनटे मंद आचेवर असे एकून १५ मिनटे शिजवून कुकर थंड होऊ द्यावा. एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात तेल गरम करून घ्यावे, त्यात थोडे जीरे टाकावे. जीरे तडतडले की त्यात शिजवलेल्या भाज्या मसाल्यासकट कुकरमधून काढून घालाव्यात. आता ह्यात चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ, गुळ आणि थोडे पाणी घालावे. त्यात मुठिया, चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी लसूण घालावी. आता सर्व हलक्या हाताने एकत्र करून १५ ते २० मिनटे वाफेवर शिजवावे. मुठिया मऊ झाल्यावर, गरम गर उंधियु, पुरी आणि जिलेबी सोबत खायला घ्या.

Web Title: Makar Sankranti 2023: Celebrate Makar Sankranti this year with Gulpoli along with tangy, juicy and nutritious udhiyu!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.