Davangiri Loni Recipe: असा बनवा ऑथेंटिक दावणगिरी लोणी स्पंज डोसा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 04:13 PM2019-08-16T16:13:48+5:302019-08-16T16:15:11+5:30
हॉटेलसारखा लोणी स्पंज डोसा खायला आता बाहेर जाण्याची गरज नाही. मस्त मऊसूत, चवदार आणि खरपूस दावणगिरी पद्धतीचा डोसा घरीही बनवता येऊ शकतो.
हॉटेलसारखा लोणी स्पंज डोसा खायला आता बाहेर जाण्याची गरज नाही. मस्त मऊसूत, चवदार आणि खरपूस दावणगिरी पद्धतीचा डोसा घरीही बनवता येऊ शकतो. ही घ्या पाककृती.
साहित्य :
साबुदाणे १/२ वाटी
उडिद डाळ १/२ वाटी
जाडे पोहे १ वाटी
तांदूळ ४ वाट्या
मेथीचे दाणे १५ते २०
मीठ चवीनुसार
खाण्याचा सोडा लहान चमचा
लोणी पाव वाटी
कृती-
- सर्व साहित्य वेगवेगळ्या भांड्यात ठेवून सात तास भिजवून ठेवा.
- मिक्सरच्या भांडयात सर्व पदार्थ एकत्र करून बारीक वाटून घ्या.
- पीठ वाटताना खूप पाणी घालू नका.
- पीठ एकदम बारीक होईल याची काळजी घ्या.
- आत तयार पिठात एक छोटा चमचा खाण्याचा सोडा व मीठ घालून एकजीव करा.
- आता तयार झालेले पीठ उष्ण जागेत शक्यतो अंधारात रात्रभर झाकून ठेवा.
- पीठ फुलून आल्यावर आता तवा तापत ठेवा.
- तव्याला चमचाभर तेल लावून घ्या. (ग्रीसिंग)
- आता तवा जास्त न तापू देतात थोड्या उंचीवरून मिश्रण तव्यावर सोडा.
- पीठ फार घट्ट आणि पातळ न करता जेमतेम पसरेल असे ठेवा.
- त्यामुळे डोसा परफेक्ट होईल.
- एक बाजू उलटून दुसऱ्या बाजूवर लोण्याचे गोळे टाका.
- तीही बाजू खरपूस भाजल्यावर सर्व्ह करा गरमागरम दावणगिरी लोणी स्पंज डोसा.
- हा डोसा बटाट्याची भाजी आणि ओल्या नारळाच्या चटणीसोबत उत्तम लागतो.