घरीच बनवा रवा डोसा ; अगदी हॉटेलमध्ये बनतो तसा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 05:46 PM2020-02-06T17:46:33+5:302020-02-06T17:51:30+5:30
कुरकुरीत रवा डोसा तसा सगळ्यांचा आवडता पदार्थ. पण हॉटेलसारखा डोसा घरी बनत नसल्याची अनेकांची तक्रार असते. मात्र मैदा न वापरता, घरच्या घरीही आणि तेही कमीत कमी वेळेत रवा डोसा बनवणे शक्य आहे. जाणून घ्या ही पाककृती.

साहित्य :
२वाट्या बारीक रवा
१/२ वाटी तांदूळ पीठ
२ मोठे चमचे मुगडाळ पीठ( बेसनाचे वापरले तरी चालेल)
२ वाट्या ताक
पाणी
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
मीठ
तेल
कृती :
- २ वाट्या बारीक रवा, १/२ वाटी तांदूळ पीठ आणि २ मोठे चमचे मुगडाळ पीठ ताकात साधारण१/२ तास भिजवून घ्या.
- अर्ध्या तासानंतर परत साधारण ३ ते ४ वाट्या पाणी टाका, रव्याच्या फुगण्यावर पाण्याचे प्रमाण अवलंबून असते
- आता त्यात आवडीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाका.
- मीठ चवीनुसार घाला.
- फ्राय पॅनवर मिश्रण पसरवून पातळ डोसा काढून घ्या. डोसा चिकटतो असे वाटल्यास सर्व बाजूंनी चमचाभर तेल टाका.
- तवा मध्यम तापला असतानाच डोसा टाकावा.
- नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा रवा डोसा.